शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी सात कोरोना बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या कंपनीतील व्यक्ती आणि त्यांना नागपूर येथे दाखल करण्यापूवी गोंदिया येथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना शुक्रवारी क्वारंटाईन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमृताच्या संपर्कात आलेल्यांचे वाढले टेंशन : अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा दहावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील मुंडीपार येथील एका वृध्दाचा कोरोनामुळे नागपुरातील रुग्णालयात गुरूवारी (दि.२६) मृत्यू झाला. या वृध्दाचा संपर्कात आलेल्या ३० जणांना जिल्हा आरोग्य विभागाने शुक्रवारी क्वारंटाईन केले होते. यापैकी सहा जणांचे आणि मुंबईहून परतलेल्या एका जणाचा स्वॅब नमुन्यांचा अहवाल रविवारी (दि.२८) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रविवारी एकाच दिवशी जिल्ह्यात सात कोरोना बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांचा आकडा १० वर पोहचला आहे.मुंडीपार येथील एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला एका ६४ वर्षीय वृध्दाचा नागपूर येथील शासकीेय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. सदर वृध्दाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात आरोग्य विभागाने सदर वृध्द काम करीत असलेल्या कंपनीतील व्यक्ती आणि त्यांना नागपूर येथे दाखल करण्यापूवी गोंदिया येथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांना शुक्रवारी क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर ४० ते ५० जणांचे स्वॅब नमुने घेवून गोंदिया येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांचा अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. यात गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव, फत्तेपूर, मुंडीपार, सेजगाव, गोंदिया येथील एकूण सहा व्यक्तींचा समावेश आहे. सदर व्यक्ती हे मृतक वृध्द ज्या कंपनीत कार्यरत होता त्याच कंपनील असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तर दुसरा एक रुग्ण हा मुंबईहून परतलेला आहे. या सर्व कोरोना बाधित रुग्णांना गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.जिल्ह्यात रविवारी आठ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा ११ वर पोहचला आहे.२६ मार्च ते २८ जूनपर्यंत एकूण ११२ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी १०२ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आतापर्यंत आपल्या घरी परतले आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये वाढरविवारी जिल्ह्यात ७ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ करण्यात आली. यात गोंदिया शहरातील कुंभारेनगर,फत्तेपूर, डोंगरगाव, या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता एकूण १५ कंटेन्मेंट झोन आहेत.२५३८ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण २६४० स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी २६४० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून ११२ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर २५३८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. १३७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलबिंत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या