शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मीटरमध्ये बिघाडाची ९४ प्रकरणे उघडकीस

By admin | Updated: November 12, 2014 22:45 IST

विद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

भरारी पथकाची कारवाई : ६९ प्रकरणात १७ लाखांचा दंड वसूलदेवानंद शहारे - गोंदियाविद्युत तारांवर आकडा लावून वीज चोरी करण्याचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर असले तरी घरगुती किंवा व्यावसायिक ग्राहकांकडून वीजेच्या मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करण्याचा प्रकारही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मीटरमध्ये विशिष्ट धातूचा उपयोग करून मीटरची गती कमी केली जाते, तर कधी घराच्या आतील बोर्डवर एक बटन लावून त्याद्वारे वीज मीटर नियंत्रित केले जाते. ते बटन बंद तर मीटरची गती बंद आणि बटन चालू तर मीटर नियमितपणे फिरणे सुरू होते. भरारी पथकाने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१४ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात अशी ९४ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.गोंदिया विद्युत विभागांतर्गत येणाऱ्या गोंदिया ग्रामीण, गोंदिया शहर, तिरोडा व गोरेगाव तालुक्यात वीज मीटरमधील बिघाडातून वीज चोरी करण्याची ७४ प्रकरणे उघडकीस आली, तर देवरी विद्युत विभागांतर्गत येणाऱ्या देवरी, सडक/अर्जुनी, आमगाव, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव तालुक्यांत २० प्रकरणे उघडकीस आली आहेत. भरारी पथकाने अशा एकूण ९४ प्रकरणांपैकी ६९ प्रकरणांतून १७ लाख २ हजार रूपयांचा दंडसुद्धा संबंधित ग्राहकांकडून वसूल केला आहे. मात्र गोंदिया शहरातील ९, गोंदिया ग्रामीण १४, तिरोडा २ अशा गोंदिया विभागातील २५ प्रकरणांत दंडाची रक्कम विद्युत विभागाला अद्याप प्राप्त झालेली नाही. देवरी विभागातील सर्वच दोषींकडून दंडाची रक्कम वसूल झालेली आहे.वीज चोरीची लहानसहान मिश्र प्रकरणेही अनेक आहेत. गोंदिया विभागामध्ये २९ मिश्र प्रकरणे भरारी पथकाने पकडली. त्यातील दोषींवर ९९ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. देवरी विभागामध्ये २० प्रकरणे असून त्यातील दोषींवर ६५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.