पहिल्याच दिवशी ७ नमुने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:11+5:30

कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उपाययोजना केल्यास ते कोरोना पसरवू शकणार नाही.

7 samples positive on the first day | पहिल्याच दिवशी ७ नमुने पॉझिटिव्ह

पहिल्याच दिवशी ७ नमुने पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्दे८ स्वॅब सेंटर सुरु : १२२ आरटी-पीसीआर तर ५८ अँटिजेनचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाधित व्यक्तींचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने गोंदिया नगरपालिका क्षेत्रात ८ ठिकाणी अदानी फाउंडेशनच्या सहकार्याने आरटी-पीसीआर टेस्टींग सेंटर शनिवारपासून (दि.१९) सुरू केले आहे. या सेंटर्समध्ये पहिल्याच दिवशी १२२ आरटी-पीसीआर तर ५८ अँटिजेनचे नमुने घेण्यात आले असून त्याची अँटिडेनचे ७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उपाययोजना केल्यास ते कोरोना पसरवू शकणार नाही.
अशात जास्तीतजास्त लोकांची टेस्ट करणे गरजेचे झाले असून शासनाचेही तसे आदेश आहेत. त्यातही आरटी-पीसीआर टेस्ट ही विश्वसनीय व तंतोतंत अहवाल देणारी टेस्ट असल्याने आता या त्यावरच जास्त भर दिला जात आहे.
यातूनच शहरातील गणेशनगर, गोविंदपूर, मरारटोली, माताटोली, मालवीय स्कूल, रामनगर, कुंभारेनगर आणि सूर्याटोला परिसरातील नगर परिषदेच्या शाळांमध्ये हे सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येकच भागात आता तपासणीची सोय झाल्याने नागरिकही तपासणीसाठी पुढे येत असल्याचे हे सेंटर्स सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी (दि.१९) दिसून आले. पहिल्याच दिवशी या सेंटर्समध्ये १८० नमुने घेण्यात आले.
त्यात १२२ आरटी-पीसीआर आणि ५८ नमुने अँटिजेनचे घेण्यात आले. ५८ नमुन्यातील सात नमुने हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिनियस रिसोर्ट मधील सेंटर बंद
आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिनियस रिसोर्टमध्ये स्वॅब टेस्टींगची सोय होती. तपासणी केंद्राच्या कमतरतेमुळे तेथे नागरिकांची चांगलीच गर्दी होत होती. मात्र आता शहरातील प्रत्येकच भागात टेस्टींग सेंटर्स झाल्याने नागरिकांना सोयीचे होत आहे. अशात जिनियस रिसोर्टमधील टेस्टींग सेंटर बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
टेस्टींग सेंटर्सची संख्या वाढविण्यात आल्याने नागरिकांना नक्कीच सोय होणार आहे. मात्र टेस्टींगसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगलीच लांबलचक प्रक्रीया करावी लागते. त्यात त्यांना पुष्कळ वेळ लागतो व त्यामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. मात्र हे सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असल्याने नागरिकांनी समजून घेत आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.

Web Title: 7 samples positive on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.