लॉकडाऊनमुळे आगाराला ७ कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:26+5:30

गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी गोंदिया आगाराला दिवसाकाठी १२ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

7 crore hit to Agara due to lockdown | लॉकडाऊनमुळे आगाराला ७ कोटीचा फटका

लॉकडाऊनमुळे आगाराला ७ कोटीचा फटका

Next
ठळक मुद्दे८० पैकी धावतात ९ बसेस रस्त्यावर : एक कर्मचारी एकच मास्कचे धोरण

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका गोंदिया आगाराला बसला आहे. २३ मार्चपासून १८ मे या ५८ दिवसात आगाराला ७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने बससेवा सुरू करण्यात आली असली तर केवळ ९ बसेस रस्त्यावर धावत आहे. त्यातही उत्पन्न मिळत नसल्याने या बसेस चालविणे सुध्दा गोंदिया आगारासाठी तोट्याचे ठरत आहे.
गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी गोंदिया आगाराला दिवसाकाठी १२ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ५८ दिवसात गोंदिया जिल्ह्याच्या बस आगाराला ६ कोटी ९६ लाख म्हणजे जवळजवळ सात कोटी रूपयांचा फटका बसला आहे.
गोंदियात एक कोरोनाचा रूग्ण आढळला होता. परंतु तो कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला. त्यामुळे जिल्ह्यात अंशत: सूट देण्यात आली होती. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी एसटी सुरू करण्यात आली.
८० बसेसपैकी नऊ बस सुरू करण्यात आल्या. त्या नऊ बस ५२ फेऱ्या मारीत आहेत. परंतु या फेऱ्यांमध्ये प्रवासी मिळत नसल्याने त्या फेऱ्यांमधून बसेसच्या डिझलचा खर्च निघणे सुध्दा कठीण जात आहे. त्यामुळे आता नवीन बस फेऱ्या वाढविणे सद्या स्थितीत शक्य नाही, असे आगार प्रमुखांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

प्रत्येक कर्मचाऱ्याला एक कापडी मास्क
कर्मचाऱ्यांची सुरक्षितता म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक कापडी मास्क देण्यात आले आहे. बसेस आगारातून सोडण्यापूर्वी त्या सॅनिटाईज केल्या जातात. बस आगारात परत आली की पुन्हा सॅनिटाईझरची फवारणी केली जात आहे. एसटीच्या वाहकांनाच मास्क द्याव्यात अश्या सूचना असताना मास्क शिल्लक असल्यामुळे चालकांनाही मास्क देण्यात आले. परंतु प्रत्येकाला एकच कापडी मास्क देण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात नाही
एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहे. परंतु महामंडळाकडून तेवढ्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलविणे लॉकडाऊनच्या काळात शक्य नाही. या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाली नाही. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हा दिलासा असला तरी कोरोनाच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक कापडी मास्क वाटप केले. तसेच सॅनिटाईझरने बसची फवारणी करण्यात येते. सद्या नऊ बसेसच्या ५२ फेऱ्या सुरू आहेत. परंतु एसटीला उत्पन्न मिळत नसल्याने पुढच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या नाही.
- संजना पटले,
आगार प्रमुख गोंदिया.

Web Title: 7 crore hit to Agara due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.