शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
4
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
5
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
7
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
8
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
9
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
10
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
11
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
12
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
13
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
14
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
15
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
16
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
17
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
18
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
19
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
20
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत पळविल्या ६८ मोटारसायकल

By admin | Updated: December 7, 2014 22:52 IST

जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या

टोळी सक्रिय : एकाच महिन्यात १५ वाहने पळविली
गोंदिया : जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. चालू वर्षाच्या ११ महिन्यांत अज्ञात चोरट्यांनी ६८ मोटारसायकल पळवून नेल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यातील एकट्या नोव्हेंबर महिन्यात १५ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक मोटार सायकल पळविण्यात आल्या आहेत. गोंदिया शहरातील गर्दीच्या ठिकाणांना या चोरट्या टोळीतील सदस्यांनी टार्गेट केले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, रेल्वे स्थानक, बाजार परिसर, जयस्तंभ चौक, बसस्थानक, शाळा, महाविद्यालय व शहरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केले आहे. एखाद्या नागरिकाने आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून बाजार परिसरात गेले तर त्यांच्यावर नजर ठेवणारा एक व्यक्ती त्या वाहनाला चोरून नेणारा दुसरा व्यक्ती असे दोघे व्यक्ती त्या मोटारसायकलला पळवितात. हे वाहन पळविण्यासाठी आरोपी चहाटपरीचा आधार घेत असल्याची माहिती आहे.
तासनतास चहाटपरीवर बसून त्या मोटारसायकलवर आपली नजर ठेवतात. विशेष म्हणजे खुल्या मोटारसायकल तर सोडाच मात्र लॉक करून ठेवलेल्या मोटारसायकलला देखील काही वेळातच पळवून नेत आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या सन २०१४ च्या ११ महिन्यांत ६८ मोटारसायकल पळविण्यात आल्या आहेत. सन २०१३ या वर्षात ४८ तर सन २०१२ मध्ये ७१ मोटारसायकल पळविण्यात आल्या होत्या. दुचाकीला पळविणाऱ्या टोळीच्या मागावर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आहे. मात्र पोलीस यंत्रणेला या चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)