६७ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:05+5:30

लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ एवढे मतदार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढावा तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत यावे यासाठी आयोगाने वेळोवेळी अभियान राबविले. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून ३१ ऑगस्टपर्यंतच्या रेकॉर्डनुसार १० लाख ९६ हजार ४४१ मतदारसंख्या होती.

67% voters are under 50's | ६७ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील

६७ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील

Next
ठळक मुद्दे१ लाख ८८ हजार ७४२ मतदार साठीपार : २६,५८४ नवमतदार निर्णायक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील सद्या स्थितीत १० लाख ९६ हजार ४४१ एकूण मतदार होते. यात सात लाख ३१ हजार ६८८ पन्नाशीच्या आतील असून या मतदारांचा टक्का ६६.७३ इतका आहे. तर साठीपार केलेले एक लाख ८८ हजार ७४२ मतदार असून १८-१९ वर्षे वयोगटातील २६ हजार ५८४ नवमतदार आहेत. विशेष म्हणजे, १० ऑक्टोबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आणखी १८२९ मतदार वाढल्याने आता १० लाख ९८ हजार २७० एकूण मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात १० लाख ७५ हजार ९३६ एवढे मतदार होते. मात्र मतदानाचा टक्का वाढावा तसेच १८ वर्षे वय पूर्ण झालेल्यांचे नाव मतदार यादीत यावे यासाठी आयोगाने वेळोवेळी अभियान राबविले. त्यामुळे मतदारांची संख्या वाढली असून ३१ ऑगस्टपर्यंतच्या रेकॉर्डनुसार १० लाख ९६ हजार ४४१ मतदारसंख्या होती.
यात १८-१९ वर्षे वयोगटातील २६ हजार ५८४ नवमतदार आहेत. याशिवाय पन्नाशीच्या आतील सात लाख ३१ हजार ६८८ मतदार आहेत. तसेच साठीपार असलेले एक लाख ८८ हजार ७४२ मतदार आहेत.विशेष म्हणजे,यामध्ये ४६२ मतदार सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे वय ९९ वर्षांपेक्षा जास्त आहे. मात्र कुणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने सातत्याने नाव नोंदणी मोहिम राबविल्याने जिल्ह्यात मतदारांची संख्या आणखी वाढली आहे.
यात, १० ऑक्टोबरच्या रेकॉर्डनुसार १८२९ मतदार आणखी वाढले असून जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या आता १० लाख ९८ हजार २७० एवढी आहे.

जिल्ह्यात महिलाराज
विधानसभा निवडणुकीत यंदा १० लाख ९८ हजार २७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पाच लाख ४५ हजार ४०४ पुरूष मतदार असून पाच लाख ५२ हजार ८६२ महिला मतदार आहेत. १० ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सात हजार ४५८ महिला मतदार जास्त आहेत. म्हणजेच, जिल्ह्यात महिलाराज दिसत असून या महिलांच्याच हाती उमेदवारांच्या नशिबाची चाबी आहे.

Web Title: 67% voters are under 50's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.