शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

६६४ विद्यार्थ्यांनी घेतला आरटीई प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही

ठळक मुद्दे५६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची तारीख दिली नाही : २३९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा उशीरा सुरू होत असल्याने आरटीईच्या प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांपैकी ६६४ जागांवर प्रवेश निश्चीत झाला आहे. उर्वरीत २३९ जागांवर प्रवेश झाला नाही.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येत आहे.शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत.या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे ती तारीख शाळा देत आहे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळा ठरवित आहे. जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले होते. प्रवेश घेण्यासाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली आहेत. तर ५६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली नाही.२३९ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली नाहीअर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ९१ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५ जणांना तारीख दिली नाही तर ७४ बालकांचा प्रवेश झाला आहे. आमगाव ८७ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणाला तारीख दिली नाही तर ७३ बालकांचा प्रवेश झाला आहे. देवरी ५५ जागांसाठी ५५ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया ३५६ जागांसाठी ३२९ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २७ जणांना तारीख दिली नाही तर २६५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोरेगाव ७४ जागां आहेत त्या सर्वांना तारीख दिली तर ६४ बालकांचा प्रवेश झाला आहे. सालेकसा ४४ जागांसाठी ४३ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणांना तारीख दिली नाही तर २१ बालकांचा प्रवेश झाला आहे. सडक-अर्जुनी ४५ जागांसाठी ३४ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर २६ बालकांचा प्रवेश झाला आहे. तिरोडा १५१ जागांसाठी १४० बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर ११६ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्हाभरात ९०३ जागांसाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५५ जणांना तारीख दिली नाही तर ६६४ बालकांचा प्रवेश झाला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण