शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनानंतरही ५३० महिलांना गर्भधारणा

By admin | Updated: March 9, 2016 02:46 IST

लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन दिले.

नरेश रहिले गोंदियालोकसंख्येवर आळा घालण्यासाठी शासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास प्रोत्साहन दिले. दोन अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी म्हणून तिसऱ्या अपत्याला शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असाही नियम करण्यात आला आहे. मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणारी यंत्रणाच अपयशी ठरल्याने शस्त्रक्रिया करणाऱ्या ५३० महिला मागील पाच वर्षात गर्भवती झाल्या आहेत. नाईलाजाने त्यांचा गर्भपात करण्यात आला.शासन आरोग्य विभागाला कुटुंब नियोजनाचे दरवर्षी उद्दिष्ट देते. परंतु गेल्या पाच वर्षात अयशस्वी झालेल्या शस्त्रक्रियांचे प्रमाण पाहता आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आपल्या यंत्रणेवर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरले, की कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या नोंदीच बोगस घेण्यात आल्या, अशी शंका येते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांना नियुक्त करण्यात येते. परंतु शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना गर्भधारणा झाल्याने त्या शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी केल्या की सामान्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केल्या, ही बाब स्पष्ट होत नाही. गर्भनिरोधक उपाय ठरले फोलगर्भनिरोधक साहित्याची जाहिरात शासन मोठ्या प्रमाणात करते. गर्भनिरोधक साहित्याचा वापर करून सुरक्षित राहण्याचा सल्ला जाहीरात व पत्रकाच्या माध्यमातून केला जात असला तरी हे गर्थनिरोधक उपाय फोल ठरले आहेत. गर्भनिरोधक साहित्याचा वापर केल्यावरही पाच वर्षात जिल्ह्यातील ३ हजार ८० महिला गर्भवती झाल्या आहेत. त्यात सन २०११-१२ या वर्षात २२१ महिला, सन २०१२-१३ मध्ये ७२३, सन २०१३-१४ मध्ये ७७५, सन २०१४-१५ मध्ये ७२१ तर २०१५-१६ च्या दहा महिन्यात ६४० अशा ३०८० महिलांचा समावेश आहे.तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव शासनाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट्य आरोग्य विभागाला दिले. वर्षाकाठी ९ हजारांपेक्षा अधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट शासन देते. परंतु त्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे फक्त दोनच डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिष कळमकर यांनी दिली आहे. २०१२-१३ मध्ये सर्वात बोगस शस्त्रक्रियाशस्त्रक्रियीनंतरही गर्भधारणा झालेल्या महिलांनी परवानाप्राप्त केंद्रातून गर्भपात केला. त्यात सन २०११-१२ या वर्षात १११ महिला, सन २०१२-१३ मध्ये १६७, सन २०१३-१४ मध्ये ९१, सन २०१४-१५ मध्ये ४७ तर २०१५-१६ च्या १० महिन्यात १४ महिलांचा समावेश आहे. या प्रकारावरून शासनाच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया उपक्रमाकडे किती लक्ष आहे हे शासकीय आकडेवारीवरूनच लक्षात येते.