दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:00:26+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३५७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

49 people in two isolation rooms | दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण

दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण

googlenewsNext
ठळक मुद्दे५७ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात : ३५७ जणांचे नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशांना खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तसेच त्यांचे स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. सध्या दोन आयसोलेशन कक्षात ४९ जण उपचार घेत आहे. जिल्ह्यात मागील ३७ दिवसात एकही कोरोना बाधीत रुग्ण न आढळल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३६७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३५७ स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळे जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यास मदत झाली असून मागील ३७ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन सुध्दा शिथिल करण्यात आले असून सर्व व्यवहार आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना सुध्दा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जात आहे. गोंदिया जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमधील आयसोलेशन कक्षात ४८ आणि आमगाव येथे १ असे ४९ जणांवर उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ५७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यात चांदोरी ४, लईटोला ५, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, उपकेंद्र बिरसी ७ , शासकीय आदिवासी आश्रमशाळा इळदा २६, समाजकल्याण निवासी शाळा डव्वा ७ आणि जलराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४ असे एकूण ५७ उपचार घेत आहेत.

Web Title: 49 people in two isolation rooms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.