शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

४४ आरोग्य सेविकांना नियुक्ती मिळणार

By admin | Updated: June 11, 2014 23:18 IST

३१ डिसेंबर नंतर त्या ४४ एएनएमला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियुक्ती आदेश दिले नव्हते. त्यामुळे ८ दिवसांपासून त्या एएनएमनी धरणे आंदोलन व दोन दिवसांपासून साखळी उपोषणाला

मोठा दिलासा : आरोग्य सेवा सुरळीत होणार, आंदोलन यशस्वी
गोंदिया : ३१ डिसेंबर नंतर त्या ४४ एएनएमला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियुक्ती आदेश दिले नव्हते. त्यामुळे ८ दिवसांपासून त्या एएनएमनी धरणे आंदोलन व दोन दिवसांपासून साखळी उपोषणाला सुरूवात केली होती. मात्र त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत त्यांना नियुक्ती आदेश देण्याचे ठरले आहे.
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कार्यरत असलेल्या ९६ कंत्राटी आरोग्य सेविकांना जिल्हा परिषदेने वर्षभरापूर्वी काढले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेसमोर त्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यामुळे जिल्हा परिषदेने ३१ डिसेंबरपर्यंत ९६ पैकी ४४ एएनएमला जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत नियुक्ती दिली होती. परंतु ३१ डिसेंबर रोजी या एएनएमचे कंत्राट संपल्याने त्यांना पुनर्नियुक्ती देणे गरजेचे होते. परंतु त्यांना दोन महिने लोटूनही नियुक्ती पत्र न दिल्यामुळे त्या ४४ एएनएमनी जिल्हा परिषदेसमोर ८ दिवसांपूर्वी धरणे आंदोलन व त्यानंतर साखळी उपोषणाला सुरूवात केली. या संदर्भात मंगळवारी (दि.१०) जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आरोग्य सभापती मदन पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी हरिष कळमकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेत त्या ४४ एएनएमला न्यायालयाचा स्थायी स्वरूपाचा आदेश येईपर्यंत नियुक्ती देण्याचे ठरविण्यात आले. यामुळे या ४४ एएनएमला बुधवारी किंवा गुरूवारी जिल्ह्यातील आरोग्य संस्थेत नियुक्ती देण्यात येणार आहे.

या ४४ एएनएमला नियुक्ती देण्यात आली नव्हती. मात्र जिल्ह्यातील १० आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेविका नाही व अनेक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. या संदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांची व नागरिकांची ओरड सुरू होती. या प्रकाराला टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने या ४४ एएनएमला नियुक्ती आदेश देण्याचे ठरविले. गोंदिया जिल्हा परिषदेने वर्षभरापूर्वी घेतलेल्या आरोग्य सेविकांची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने घेण्यात आली. परंतु आम्हाला नियुक्ती द्या नंतर भरती घेतलेल्या नविन परिचारिकांना नियुक्ती द्यावी यासाठी बंद पत्रित असलेल्या आरोग्य सेविकांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत एका प्रकरणात १२ बंद पत्रित आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याशिवाय गोंदिया जिल्हा परिषदेने घेतलेल्या आरोग्य सेविका भरतीचा निकाल अद्याप जाहिर न झाल्याने २६ जागेसाठी घेण्यात आलेला हा निकाल न्यायालयात आहे. ते प्रकरण निकाली काढल्यास जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थेत त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तेव्हापर्यंत या ४४ कंत्राटी आरोग्य सेविकांना त्याठिकाणी सेवा देण्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात येत असल्याचे कळमकर यांनी सांगितले.
वारंवार आमच्यावरच अन्याय केला जात असून २३६ उपकेंद्रामध्ये असलेल्या सर्व कंत्राटी आरोग्य सेविकांच्या कामाचे मूल्यमापन वर्षाअखेर करून त्यांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबवावी, अशी मागणी त्या ४४ एएनएमनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)