शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरातील ४२० शस्त्रे झाली जमा

By admin | Updated: October 6, 2014 23:14 IST

निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच घातपात होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवानाधारकांना आपले शस्त्र संबंधित

गोंदिया : निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच घातपात होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवानाधारकांना आपले शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ५२३ शस्त्र परवानाधारक असून यातील ४२० जणांनी शस्त्र जमा केले आहे. उर्वरित ६९ जणांनी अजूनही शस्त्र जमा केले नाही. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत ५९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २१ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत १५ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६ जणांनी शस्त्र जमा केले. यातील ११ जणांना शस्त्र आवश्यक असल्यामुळे परत घेता येत नाही. रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ४९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील २४ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २० जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. यातील ५ जणांना स्वत:कडे शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ५ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ३९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३० जणांनी शस्त्र जमा केले. परंतु ८ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. एका व्यक्तीला शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत १३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १३ जणांनी शस्त्र जमा केले. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ११ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ९ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत १९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १९ जणांनी शस्त्र जमा केले. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ८ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु २ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ३९ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ३९ जणांनी शस्त्र जमा केले. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ६१ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६० जणांनी शस्त्र जमा केले. एका व्यक्तीला शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ६२ जणांनी शस्त्र जमा केले. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत १५ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील १ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु १४ जणांना शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ४३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ४३ जणांनी शस्त्र जमा केले. अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ६३ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील ४६ जणांनी शस्त्र जमा केले. परंतु १४ जणांनी अजूनपर्यंत शस्त्र जमा केले नाही. तर ३ जणांना शस्त्र ठेवणे आवश्यक आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत २१ शस्त्र परवानाधारक आहेत. यातील २१ जणांनी शस्त्र जमा केले. जिल्ह्यात ५२३ शस्त्र परवानाधारक असून ४२० जणांनी शस्त्र जमा केले आहे. तर गरज नसलेल्या ६९ परवानाधारकांचे शस्त्र अजूनही संबंधित पोलीस ठाण्यात जमा झालेले नाही.