शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के कुटूंब आजही गवताच्या छताखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते.

ठळक मुद्देघरकुल योजनेचा पत्ताच नाही : सर्वांना घराचे केवळ स्वप्नच, मुरकुडोह दंडारीवासीयांची उपेक्षाच

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तालुक्यातील मुरकुडोह दंडारी वसाहतीला भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फारच दूर असल्याचे दिसून येते. येथील चाळीस टक्के कुटुंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या स्वप्नातील पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.महाराष्ट्र-मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्याच्या एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे मुरकुडोह दंडारी आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल उंच उंच पहाड आणि खोल दऱ्याने या परिसराला व्यापले आहे. मधात ६-७ किमी चा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांंगण्यावरुन वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित वन उपज गोळा करुन आपल्या मुलभूत गरज भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तपूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळी येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा कालांतराने येथे त्या टोळीचे कुटूंब बिस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. आजही येथील लोकांचे जीवन या गरजा पूर्ण करण्यापूर्वीच अडकले आहे असे दिसून आले. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारु छताचे आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात.या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारु घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर केव्हा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.मागील ३०-४० वर्षापासून केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. दर घरकुल योजना या गावापर्यंत पोहचलीच नसल्याचे चित्र आहे.मंजूर झाले तरी घरकुल बनले नाहीमुरकुडोह-दंडारी या गावांचा समावेश ग्रामपंचायत दरेकसामध्ये आहे. या ग्रामपंचायतीमध्ये दरेकसा सोडून डहाराटोला, दलदलकुही वंजारी या गावाचा समावेश असून मुरकुडोह, दंडारीचे पाचही गाव वार्ड नं.२ मध्ये येत आहे. या वॉर्डात घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी अनेक वेळा मागणी केली. दरम्यान काही घरकुल शासनाकडून मंजूर झाले परंतु प्रत्यक्षात बनलेच नाही.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना