शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत शोधली २४५ शाळाबाह्य बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

शोधमोहीम विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुका समन्वयक, १०२६ बालरक्षक व शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आली. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे, इयत्ता १ली  ते ४ थीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. इतर राज्यांत अजूनही उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही पालक बालकांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत, तरीसुद्धा शिक्षण सुरू आहे.

ठळक मुद्देशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाची लगबग

नरेश रहिलेलाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने ९ ते १२ फेब्रुवारी या ४ दिवसांत शोधमोहीम राबविली होती. त्यातील पहिल्या २ दिवसांत जिल्ह्यातील ४०२ वीटभट्यांवर भेट देऊन १९५ शाळाबाह्य बालके वीटभट्ट्यांवरून शोधण्यात आली. तर ११ व १२ फेब्रुवारी या २ दिवसांत ५० शाळाबाह्य बालके अस्थायी कुटुंबाकडून शोधण्यात आली आहेत. ही शोधमोहीम विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तालुका समन्वयक, १०२६ बालरक्षक व शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात आली. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे, इयत्ता १ली  ते ४ थीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. इतर राज्यांत अजूनही उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. काही पालक बालकांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत, तरीसुद्धा शिक्षण सुरू आहे. शिक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी-कर्मचारी, बालरक्षक व शिक्षकांनी उत्साहाने शोधमोहिमेत सहभाग घेतला.  प्रत्यक्ष शोध घेतल्यावर सर्व बालके आपल्या मूळ गावी शाळेत दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.  शोधमोहिमेत आढळलेली बालके स्थलांतर होऊन आली आहेत. ही बालके शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी जवळच्या शाळेत बालकांना दाखल करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शोधमोहिमेत वीटभट्टीवर १९५ बालके व इतर ठिकाणी ५० अशी एकूण २४५ बालके आढळली आहेत. २७ जानेवारी २०२१ पासून इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थांची शाळा सुरू आहे. सतत ३० दिवस गैरहजर बालके शाळाबाह्य बालकांमध्ये येतात. मार्च २०२१ मध्ये ५वी ते ८वीत सतत ३० दिवस गैरहजर बालकांची माहिती घेण्यात येणार असल्याचे समन्वयिका कुलदीपिका बोरकर यांनी सांगितले. 

आमगाव तालुक्यात वीटभट्टीवर सर्वाधिक बालके शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी ‘मिशन वीटभट्टी’ राबवून शाळाबाह्य मुलांना पकडले. त्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले आमगाव तालुक्यात आढळली असून त्यांची संख्या ५३ आहे. शिवाय, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३, देवरी २०, गोंदिया ४४, गोरेगाव २६, सडक-अर्जुनी ७, सालेकसा     २५ व तिरोडा तालुक्यात १७ अशी एकूण १९५ बालके वीटभट्टीवर आढळली आहेत. भटक्या लोकांकडे आढळली ५० बालकेशाळाबाह्य मुलांचा शोध घेताना गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने ११ व १२ फेब्रुवारी रोजी  शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली असता अस्थायी कुटुंबातील लोकांकडे ५० शाळाबाह्य बालके आढळलेली आहेत. त्यात गोंदिया तालुक्यात १९,   गोरेगाव १३, सडक-अर्जुनी १० व तिरोडा तालुक्यात ८ बालके आढळली आहेत.

 

टॅग्स :Educationशिक्षण