२४ झाले मुक्त तर २५ बाधितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:41+5:30

बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश असून यात शहीद मिश्रा वार्ड २, सुभाष वार्ड १, डोंगरवाव खडकी १ आणि बिरसी येथील १ बाधिताचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून यामध्ये कुंभारटोली २, बोदा १, किंडगीपार १, आमगाव १ येथील तर सडक अजुर्नी शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे.

24 were released and 25 were released | २४ झाले मुक्त तर २५ बाधितांची पडली भर

२४ झाले मुक्त तर २५ बाधितांची पडली भर

Next
ठळक मुद्देतिघांचा मृत्यू : कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५३ वर, १० हजार ८८६ स्वॅब नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याने गावकऱ्यांसह प्रशासनाची चिंता वाढविली आहे. बुधवारी (दि.१२) आणखी २५ कोरोना बाधितांची भर पडली तर तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हावासीयांना धक्का बसला. मात्र २४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये तिरोडा तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश असून यात शहीद मिश्रा वार्ड २, सुभाष वार्ड १, डोंगरवाव खडकी १ आणि बिरसी येथील १ बाधिताचा समावेश आहे. तर आमगाव तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून यामध्ये कुंभारटोली २, बोदा १, किंडगीपार १, आमगाव १ येथील तर सडक अजुर्नी शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यातील गिरोला येथील १ तसेच गोंदिया तालुक्यातील ११ रुग्णांचा समावेश असून यामध्ये झिलमिली १, नागरा २, रायपूर १, अदासी तांडा येथील १ आणि गोंदिया शहरातील सिव्हील लाईन २, न्यू लक्ष्मीनगर १, लोहा गार्डन १, दुर्गा चौक १, कुंभारेनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील १४, सालेकसा तालुक्यातील १, तिरोडा तालुक्यातील १, आमगाव तालुक्यातील ३, सडक अर्जुनी तालुक्यातील ४ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्या तीन रुग्णांमध्ये तिरोडा तालुक्यातील २ आणि गोंदिया येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

११ हजार ७९० स्वॅब नमुन्यांची तपासणी
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत ११ हजार ७९० स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७०८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. तर १० हजार ८८६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहे.१९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे. तर १२२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४१८ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २५३ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहे.
जिल्ह्यात आता ११० कंटेन्मेंट झोन
४जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संख्येत वाढ होत असून ग्रामीण भागात अधिक प्रादुर्भाव होत आहे. परिणामी कंटेन्मेंट झोनमध्ये सुध्दा वाढ झाली असून जिल्ह्यात सध्या स्थितीत ११० कंटेन्मेंट झोन आहेत.

Web Title: 24 were released and 25 were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.