शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

२२१ गर्भपात अविवाहित मुलींचे!

By admin | Updated: March 8, 2016 02:02 IST

आजघडीला सर्व स्तरातून महिलांचा सन्मान होत असताना भावनेच्या आहारी जाऊन समाजकंटकांच्या कृत्याला बळी

नरेश रहिले ल्ल गोंदियाआजघडीला सर्व स्तरातून महिलांचा सन्मान होत असताना भावनेच्या आहारी जाऊन समाजकंटकांच्या कृत्याला बळी पडणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या समाजात बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे त्या मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांना गर्भधारणेच्या अवस्थेपर्यंत मजल मारल्या गेली. त्यामुळे मागील पाच वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २२१ अविवाहीत मुलींचा गर्भपात करावा लागला. प्रौगंडावस्थेतील मुलींना प्रेमाच्या भूलथापा देत त्यांचे लैंगिक शोषण करणारे समाजात काही कमी नाही. आई- वडीलांनी मुला-मुलींकडे केलेले दुर्लक्ष यामुळे मुले-मुली नितीमत्ता सोडून संस्कारहिन कार्य करण्यास प्रवृत्त होतात. आधुनिक साहित्याच्या वापरामुळे प्रत्येक वस्तू जवळ आल्यामुळे अ‍ॅड्राईड मोबाईच्या माध्यमातून अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून उत्तेजना मिळालेली मुले कोवळ्या मनाच्या मुलींवर प्रेमाचे जाळे टाकून त्यांना आपल्या फासात अडकविण्याचा प्रयत्न करतात. मुलगी अडकल्यास तिचे लैंगिक शोषण करणे हेच त्यांचे लक्ष्य असल्याने त्या मुलीचे लैंगिक शोषण करून तिला वाऱ्यावर टाकले जाते. अशातूनच १५ वर्षाखालील गर्भधारणा झालेल्या २२१ मुलींचा मागील पाच वर्षात गर्भपात करण्यात आला. सन २०११-२०१२ या वर्षात ११ मुलींचा, सन २०१२-२०१३ या वर्षात ४८ मुलींचा, सन २०१३-२०१४ या वर्षात ६२, सन २०१४-२०१५ या वर्षात ६१, तर सन २०१५-२०१६ या वर्षाच्या दहा महिन्यात ४० अविवाहित मुलींचा गर्भपात करण्यात आला. या पाच वर्षात झालेल्या अविवाहित मुलींच्या गर्भपातावरून समाजात किती भयावह स्थिती आहे या च्या आकडेवारीवरून दिसून येते. या साठी पालकांनी जागृत होण्याची गरज आहे. शाळा महाविद्यालयातही विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे समूपदेशन करणे आवश्यक आहे. तसेच कायद्याची कठोरता मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे अश्या घटनांना कमी करण्यास किंवा पायबंद घालण्यास मदत होऊ शकते.सध्या प्रत्येकाच्या हाती आलेला मोबाईल आणि त्यामुळे संपर्काचे सोपे झालेले माध्यम यामुळेही मुलींच्या शोषणाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.बलात्कारातून गर्भधारणेचे १३ गर्भपातमहिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे बळकट करण्यात आले असले तरी महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांत दरवर्षी वाढ होत आहे. बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या १३ मुलींनी परवानाप्राप्त गर्भपात केंद्रात गर्भपात केला. यात सन २०११-२०१२ या वर्षात ४, सन २०१२-२०१३ या वर्षात ४, सन २०१३-२०१४ या वर्षात २, सन २०१४-२०१५ या वर्षात २ व सन २०१५-२०१६ मध्ये १ मुलीने गर्भपात केला.गर्भपात करणाऱ्या ‘त्या’ १५ महिला कोण?गर्भपात करणाऱ्या महिलेची इत्यंभूत माहिती घेतल्याशिवाय गर्भपात करता येत नाही, असा नियम असताना सन २०११-२०१२ या वर्षात शासकीय रूग्णालयात ५ तर खासगी रूग्णालयात १० असे एकूण १५ गर्भपात करण्यात आले. परंतु हे गर्भपात कुणाचे यासंदर्भात शासकीय रूग्णालयात माहिती नाही. अनोळखी महिलांचा गर्भपात असे नमूद करण्यात आले. त्यामुळे अनोळखी महिलांचा गर्भपात कसा झाला हे शोधणे आवश्यक आहे.