शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत २०४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

By admin | Updated: February 4, 2016 01:53 IST

शेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो.

ठिंबक व तुषार सिंचन : विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमदेवानंद शहारे गोंदियाशेतकऱ्यांनी धानपिकाशिवाय फळ व फूलशेतीकडे वळावे यासाठी शासन कृषी विभागामार्फत अनेक योजना राबवितो. अनेक योजनांत अनुदानही दिल्या जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात धानपीक वगळता इतर शेती करण्यास शेतकरी उत्सुक नसल्याचे प्रस्ताव व मंजूर प्रकरणांनुसार दिसून येते. मागील दोन वर्षांत ठिंबक व तुषार सिंचन योजनेचा केवळ २०४ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे कृषी विभागाने दिलेल्या संख्येवरून दिसून येते.ठिंबक सिंचन म्हणून रोपांच्या मुळांवर विशिष्ट पद्धतीने थेंबथेंब पाणी देणे. तर तुषार सिंचन (स्प्रिंग कलर) म्हणजे रोपांच्या वरून विशिष्ट पद्धतीने फव्वारा पद्धतीने पाणी देणे, अशी सुटसुटीत व्याख्या केली जाऊ शकते. विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत यात सन २०१३-१४ मध्ये केवळ ५२ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी त्यांना ६५.१४ लाख रूपयांचे अनुदानही देण्यात आले. तर सन २०१४-१५ मध्ये १५२ शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यांना अनुदानापोटी २०.१३ लाख रूपये देण्यात आले. तर सन २०१५-१६ मधील २५१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्रस्तावित असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सदर २५१ प्रस्तावित प्रस्तावांमध्ये आमगाव तालुक्यातील १०, अर्जुनी-मोरगार तालुक्यातील २५, देवरी तालुक्यातील ९, गोंदिया तालुक्यातील ५१, गोरेगाव तालुक्यातील २७, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९८, सालेकसा तालुक्यातील ८ व तिरोडा तालुक्यातील २२ प्रस्तावांचा समावेश आहे. हे सर्व प्रस्ताव ७ डिसेंबर २०१५ ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान आॅनलाईन लिंकिंग करण्यात आले आहेत. मात्र यापैकी किती शेतकरी सदर योजना राबविण्यासाठी पुढे येतात, हे वेळेच सांगेल. लाभार्थ्याची पात्रतामागील दोन वर्षांपासून सदर योजना सुरू आहे. लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सातबारा व ८ अ असावा. शेतात विहीर किंवा बोअरवेल असावी. जे पीक घ्यायचे आहे त्याची नोंद सातबारावर असावी. किंवा मंडळ कृषी अधिकाऱ्याने मौका तपासणी अंती पीक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. विद्युत पंपाची जोडणी असावी. सिंचन क्षेत्र ०.२० हेक्टरपेक्षा कमी नसावे. योजनेत अनुसूचित जातीसाठी १६ टक्के, अनुसूचीत जमातीसाठी ८ टक्के, अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी ३३ टक्के रक्कम उपयोगात आणावी तसेच लाभार्थ्याने यापूर्वी विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अत्यल्प म्हणजे ज्याची शेती एक हेक्टरपर्यंत व अल्प म्हणजे एक ते दोन हेक्टरपर्यंत शेती, असा अर्थ आहे.