शिष्यवृत्ती परीक्षेत २०९८ विद्यार्थी

By Admin | Updated: March 23, 2015 01:38 IST2015-03-23T01:38:53+5:302015-03-23T01:38:53+5:30

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा तालुक्यात विविध ठिकाणी शांततेत पार पडली. २०९८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

20 9 8 students in scholarships | शिष्यवृत्ती परीक्षेत २०९८ विद्यार्थी

शिष्यवृत्ती परीक्षेत २०९८ विद्यार्थी

कालीमाटी : पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीची परीक्षा तालुक्यात विविध ठिकाणी शांततेत पार पडली. २०९८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
आमगाव तालुक्यात १६ केंद्रावर २०२५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक गटातील ११४१ व माध्यमिकची ९८५ विद्यार्थी संख्या होती.
तालुक्यात जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कालीमाटी, जि.प. हाय. आमगाव, विद्या निकेतन कॉन्व्हेंट, जि.प.प्रा. शाळा अंजोरा, जि.प. हाय. कट्टीपार, जि.प. वरिष्ठ प्राथ. कातुर्ली, हरिहरभाई पटेल चिरचाळबांध, संत जयरामदास विद्यालय ठाणा, जि.प. वरिष्ठ प्राथ. तिगाव, आदर्श विद्यालय, जि.प. प्राथ. बोरकन्हार, जिवन ज्योती कातुर्ली, इंदिरा गांधी हाय. कालीमाटी, जि.प. शाळा शिवणी, समर्थ विद्यालय तिगाव, जि.प. प्रा.शाळा ठाणा आदी केंद्रावर २०९८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
प्रतिनिधीने विद्यानिकेतन कॉन्व्हेंट या परीक्षा केंद्रावर येथे भेट दिली असता चोख बंदोबस्त दिसून आला. केंद्राबाहेर पालकांची अमाप गर्दी होती. मात्र सुरळीतपणे व शांततेत शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली. परिक्षेसाठी गटशिक्षणाधिकारी के.वाय. सोयाम यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी सी.बी.पाचोळे, डब्ल्यू.एस. घोसे, पर्यवेक्षक एस.जी. मेंढे, के.जे.बर्वे व केंद्रप्रमुख ओ.एस. बिसेन, ताजने आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: 20 9 8 students in scholarships