शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने १७ कोटींचे नुकसान; पुरात वाहून ७ तर वीज पडून ५ जणांचा मृत्यू

By नरेश रहिले | Updated: September 21, 2022 16:05 IST

९ हजार २२५ घरे, गोठ्यांचे नुकसान

गोंदिया : यंदा १ जून ते ३१ ऑगस्ट २०२२ या काळात आलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील १७ कोटी ३६ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान केले. यात मनुष्य प्राणहानी, जनावरांचा मृत्यू, गोठे व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने सानुग्रह मदत करावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पुरात वाहून ७ जणांचा तर वीज पडून यंदा ५ जणांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील ९७४ कुटुंबे बाधित झाली. मनुष्य हानीकरीता ४८ लाख १७ हजार २०० रुपये, जनावरे हानीकरीता २० लाख २३ हजार २५० रुपये, घर, गोठे यांच्या हानीकरीता १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये तर बाधित व्यक्तींकरीता ८२ लाख असे एकूण १७ कोटी ३६ लाख ७३ जार २५० रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पावसामुळे १२ जणांचा मृत्यू

पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. यातील १६ प्रकरणे जिल्हा प्रशासनाने पात्र केली आहेत. यातील १५ जणांना ४४ लाख १७ हजार २०० रूपयाची मदतही देण्यात आली आहे. ७४ जनावरांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे ७४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यात मोठी दुधाळू जनावरे ३१, लहान दुधाळू जनावरे १८, ओढा काम करणारी मोठी जनावरे १४ तर ओढा काम करणारी लहान जनावरे ११ मृत पावली आहेत. यात मृत जनावरांच्या मालकाला सानुग्रह राशी म्हणून २० लाख २३ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत.९२२५ घर, गोठ्यांचे नुकसान

गोंदिया जिल्ह्यात पावसाने ११९ घरे जमीनदोस्त झालीत. ७ हजार २८८ घरांची अंशत: पडझड तर बााधीत सलेल्या १८१८ गोठ्यांची पडझड झाली आहे. यांना मदतीपोटी १५ कोटी ८६ लाख ३२ हजार ८०० रुपये सानुग्रह राशी दिली जाणार आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसweatherहवामानDeathमृत्यूgondiya-acगोंदिया