शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१६ विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक

By admin | Updated: February 4, 2015 23:18 IST

स्व. मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शाळांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देण्यात

गोंदिया : स्व. मनोहरभाई पटेल यांच्या १०९ व्या जयंतीप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शाळांत व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदक देण्यात येणार आहेत. सदर समारंभ सोमवारी (दि.९) दुपारी १२ वाजता मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (एमआयईटी) कुडवा येथे होणार आहे.सुवर्णपदक वितरण समारंभाचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटर भारतरत्न खा. सचिन तेंदुलकर यांच्या हस्ते ना. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. अतिथी म्हणून चित्रपट निर्देशक राजकुमार हिरानी, एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष व मॅककेन वर्ल्डग्रुप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसुन जोशी, आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी राज्यमंत्री विलासराव शृंभारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आ. दिलीप बंसोड, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. अनिल बावणकर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. मधूकर कुकडे, मनोहरभाई पटेल अकादमीचे अध्यक्ष वर्षा पटेल उपस्थित राहतील. सुवर्णपदक वितरण समारंभाची तयारी आ. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील १६ विद्यार्थ्यांची निवड सुवर्णपदकांसाठी करण्यात आली आहे. यात गुजराती नॅशनल हायस्कूलमधून एसएससी परीक्षेतील प्रथम नेहा झनेश पशिने, पवन रूमेश्वर रहांगडाले, गोंदिया जिल्ह्यातून एसएससी परीक्षेत प्रथम आलेला आकाश नितीन कोतवाल, दीपिका दामोधर वाघमारे, शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीतील प्रथम मुस्कान महेश अग्रवाल, गोंदिया जिल्ह्यातून बारावीतील प्रथम प्रशांत चैतराम पारधी, गोंदिया जिल्ह्यातून बीए प्रथम श्रेणीत रेणू अशोककुमार अग्रवाल, बीकॉम प्रथम श्रेणी पिंकी महेशकुमार सचदेव, बीएससी प्रथम श्रेणी विदेश राजकुमार रामटेके, बीई प्रथम श्रेणी रौनक विजयकुमार वेगड, भंडारा जिल्ह्यातून दहावीत प्रथम क्षितिजा नरेंद्र राजाभोज, बारावीत प्रथम पूनम भोजराज शहारे, बीए श्रेणीत प्रथम चेतना जवाहर तर्जुले, बीकॉम श्रेणीत प्रथम मंगेश चरणदास कोचे, बीएससी श्रेणीत प्रथम तृप्ती नूरदेव चौधरी व बीई श्रेणीत प्रथम चेतन प्रमोद अग्रवाल यांचा समावेश आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल स्मृती समितीचे अध्यक्ष हरिहरभाई पटेल व मनोहरभाई पटेल अकादमीचे सचिव आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे. (प्रतिनिधी)