शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता उल्लंघनाच्या १६ प्रकरणांची नोंद

By admin | Updated: September 30, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता १२ सप्टेंबरपासून लागली. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आचार संहिता उल्लंघन करणारे १६ प्रकरणे नोंद करण्यात आले. यापैकी सहा प्रकरणांत

गोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता १२ सप्टेंबरपासून लागली. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी आचार संहिता उल्लंघन करणारे १६ प्रकरणे नोंद करण्यात आले. यापैकी सहा प्रकरणांत विविध पोलीस ठाण्यांतर्गत २६ लाख २४ हजार ८०० रूपये जप्त करण्यात आले. तसेच १० प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली.१९ सप्टेंबर रोजी भरारी पथकाच्या तपासणीदरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत पाच लाख ५० हजार रूपये, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत चार लाख ९७ हजार, २३ सप्टेंबर रोजी तिरोडा-तुमसर मार्गावर तीन लाख रूपये, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हरदोली नाक्यावर १० लाख रूपये, २५ सप्टेंबरला गोरेगाव ठाण्यांतर्गत दोन लाख रूपये व २७ सप्टेंबरला गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७७ हजार ८०० रूपये रोख जप्त करण्यात आले.या सर्व प्रकरणांची तक्रार संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित ठाण्यांत नोंदविल्या आहेत. आचार संहिता उल्लंघनाच्या प्रकरणांत १२ सप्टेंबर रोजी गोंदिया शहरात वर्तमान पत्रात विनापरवानगी पत्रके वाटण्यात आली. १९ सप्टेंबरला अर्जुनी/मोरगाव येथे निवडणूक पत्रके दुकानाच्या समोर व नवेगावबांध ग्रामपंचायतीच्या मुख्य दारावर लावण्यात आल्याची तक्रार नोंदविण्यात आली. २१ सप्टेंबर रोजी अर्जुनी/मोरगावात जवळपास एक लाख ३९ हजार रूपयांची ५४४ लिटर दारू व जवळपास चार लाख रूपयांची टाटा सुमो जप्त करण्यात आली. २३ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रात मुद्रक व प्रकाशकाच्या नावाविनाच पत्रके मिळाल्याची तक्रार, गोंदियात एक हजार रूपयांची देशी दारू व २५ हजार रूपयाची दुचाकी जप्त करण्याच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत कुंभारटोली येथे मंजुरीविनाच सभा घेतल्याची तक्रार मिळाली आहे. २५ सप्टेंबर रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रांतर्गत विना मुद्रक व प्रकाशकाचे नावाचे निवडणुकीचे फलक (बोर्ड) लावण्याची तक्रार नोंद करण्यात आली. तिरोड्याच्या चिखली गावात २० लिटर दारू, एक हजार रूपये रोख व एक दुचाकी वाहन असे एकूण ४० हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.