कोविड रूग्णांसाठी १५३५ खाटा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:00 AM2020-10-21T05:00:00+5:302020-10-21T05:00:06+5:30

येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ५४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १२२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १३२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ६ खाटा उपलब्ध आहेत.

1535 beds available for Kovid patients | कोविड रूग्णांसाठी १५३५ खाटा उपलब्ध

कोविड रूग्णांसाठी १५३५ खाटा उपलब्ध

Next
ठळक मुद्देएकूण १८६४ खाटांची सुविधा : सध्या ३२९ रुग्ण भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करता यावे यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १८४६ खाटांची क्षमता आहे. मंगळवारी (दि.२०) जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रूग्णालयांमध्ये ३२९ रुग्ण भरती असून १५३५ खाटा कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.
येथील कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० खाटांची क्षमता असून ४६ रूग्ण भरती असल्याने ५४ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय एम.एस.आयू मध्ये १४० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १२२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय केटीएस रुग्णालयात १५० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने १३२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड रुग्णालय तिरोडा (डीसीएचसी) मध्ये २० खाटांची क्षमता असून १४ रूग्ण भरती असल्याने ६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स (मरारटोली) येथे १०६ खाटांची क्षमता असून ३ रूग्ण भरती असल्याने १०३ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये २८० खाटांची क्षमता असून १८ रूग्ण भरती असल्याने २६२ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) येथे १२० खाटांची क्षमता असून १५ रूग्ण भरती असल्याने १०५ खाटा उपलब्ध आहेत.
तसेच कोविड सेंटर आमगाव येथे ५२ खाटांची क्षमता असून १६ रूग्ण भरती असल्याने पूर्ण ३६ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सडक-अर्जुनी येथे ८० खाटांची क्षमता असून १२ रूग्ण भरती असल्याने ६८ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर गोरेगाव येथे ९० खाटांची क्षमता असून ५ रूग्ण भरती असल्याने ८५ खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर देवरी येथे ८० खाटांची क्षमता असून १० रूग्ण भरती असल्याने ७० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर चिचगड येथे १०० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण नसल्याने सर्व १०० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर सालेकसा येथे ८० खाटांची क्षमता असून एकही रूग्ण भरती नसल्याने पूर्ण ८० खाटा उपलब्ध आहेत. कोविड सेंटर अर्जुनी-मोरगाव येथे ८० खाटांची क्षमता असून २१ रूग्ण भरती असल्याने ५९ खाटा उपलब्ध आहेत. नवेगावबांध येथे ६० खाटांची क्षमता असून १ रूग्ण भरती असल्याने ५९ खाटा उपलब्ध आहेत. तर येथील बाई गंगाबाई कोविड मॅटरनिटी हॉस्पीटलमध्ये १८ खाटांची क्षमता असून १३ रूग्ण भरती असल्याने ५ खाटा उपलब्ध आहेत.
खाजगी रुग्णालयांपैकी येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ७४ खाटांची क्षमता असून २४ रूग्ण भरती असल्याने ५० खाटा उपलब्ध आहेत. सहयोग हॉस्पिटलमध्ये ६६ खाटांची क्षमता असून २१ रूग्ण भरती असल्याने ४५ खाटा उपलब्ध आहेत. श्री राधे कृष्णा हॉस्पिटलमध्ये ४० खाटांची क्षमता असून २९ रूग्ण भरती असल्याने ११ खाटा उपलब्ध आहेत. बाहेकार हॉस्पिटल गोंदियामध्ये ३० खाटांची क्षमता असून १५ रूग्ण भरती असल्याने १५ खाटा उपलब्ध आहेत. के.एम.जे हॉस्पिटल गोंदिया येथे ९ खाटांची क्षमता असून ७ रूग्ण भरती असल्याने २ खाटा उपलब्ध आहेत. मीरावंत हॉस्पीटलमध्ये ९ खाटांची क्षमता असून एकही रूग्ण भरती असल्याने ९ खाटा उपलब्ध आहे. तर अग्रसेन भवन येथे ८० खाटांची व्यवस्था असून २३ रूग्ण भरती असल्याने ५७ खाटा उपलब्ध असल्याची माहिती आहे.

Web Title: 1535 beds available for Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.