शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठीचे १५२३ बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 6:00 AM

corona Gondia News महिनाभरापूर्वी बेडसाठी दाणादाण होत असताना आता मात्र बेड रिकामे होत असल्याने आता कोरोनाची दहशत संपत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात १८४६ बेडची सोय३२३ रूग्ण घेताहेत उपचार

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दहशतीत मागील ६ महिन्यांपासून असलेला गोंदिया जिल्हा आता सावरू लागला आहे. महिनाभरापूर्वी बेडसाठी दाणादाण होत असताना आता मात्र बेड रिकामे होत असल्याने आता कोरोनाची दहशत संपत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. रविवारपर्यंत गोंदिया जिल्ह्यात कोरोना रूग्णांसाठी १८४६ बेडची सोय करण्यात आली आहे. यात ३२३ रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर १५२३ बेड रिकामे आहेत.

आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात ६६६४३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ८७४५ जण कोरोना बाधीत आढळले आहेत. यातील ९७३ कोरोना रूग्ण क्रियाशील आहेत. तर ७६६१ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाने गोंदिया जिल्ह्यात आतापर्पयंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ह्यमाझे कुटुंब-माझी जबाबदारीह्ण या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा तत्पर असल्याचे दिसत आहे.

खासगी कोविड सेंटरचा दररोजचा खर्च?खासगी रूग्णालयात असलेल्या एका रूग्णामागे सहा-सात हजार रुपए खर्च होतो. कमी बेडचे कोविड सेंटर चालविणे खासगी डॉक्टरांनाही परवडत नसल्याची ओरड खासगी कोविड सेंटर चालविणा?्यांची आहे.एकीकडे खासगी कोवीड सेंटरमध्ये आता रुग्ण कमी जात असल्याने सेंटर चालविणे परवडत नसल्याची कुणकुण खासगी डॉक्टरांकडून सुरू झाली आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना समाधान होत आहे.आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने बेड सहजरित्या रूग्णांना उपलब्ध होत आहेत. कोरोनाची असलेली दहशत संपत आहे. आता गरजूंना उपचार मिळावा यासाठी नागरिक समजदारीने वागत आहेत. कोरोना झाला की बेडच हवा आहे ही चुकीची गोष्ट नागरिकांच्या लक्षात आली आणि गरजूंसाठी बेड रिकामे होऊ लागले.

कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने आता सहजरित्या रूग्णांना बेड उपलब्ध होत आहेत. गरजूंनाच बेड मिळावे यासाठी झालेल्या प्रयत्नांमुळे व लोकांनी घेतलेल्या काळजीमुळे बेड उपलब्ध आहेत.-डॉ. अरविंद खोब्रागडे

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या