शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी १५ निमलष्करी कंपन्या

By admin | Updated: September 21, 2014 23:52 IST

जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा

४१ केंद्र संवेदनशील : २४ पथके निगरानी करणारनरेश रहिले - गोंदियाजिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, तिरोडा व आमगाव या चार विधानसभातील मतदारांसाठी १२३० मतदान केंद्र आहेत. मात्र यापैकी २० केंद्र संवेदनशील असून त्याठिकाणी बोगस मतदान व मतदारांना दमदाटी देण्याचा प्रकार घडू शकतो. तसेच नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील उपद्रवी केंद्र म्हणून २१ केंद्र जिल्ह्यात गणले जातात. जिल्ह्यातील निवडणुक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी पोलीस विभागाने १५ निमलष्करी कंपन्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पोलीस दलाच्या व्यतिरीक्त केंद्रीय निमलष्करी दलास पाचारण करण्यात आले आहे. निवडणुकीदरम्यान होणाऱ्या गैरकृत्यावर पोलीस दलाची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहे. त्या प्रत्येक मतदार संघात तीन भरारी पथक व तीन निगरानी पथक ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात एकूण १२ भरारी पथके तर १२ निगरानी पथके काम करणार आहेत. लोक प्रतिनिधी अधिनियम १९५१, भारतीय दंडविधान संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत निवडणुकीच्या अनुसंगाने निवडणूक विषयी पत्रके, पोस्टर, मुद्रकांचे नाव पत्याशिवाय छापणे किंवा प्रकाशित करणाऱ्याला सहा महिन्याचा कारावास किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. मतदारांना लाच देणे, मतदारांना गैरवाजवी दडपण आणणे, धाक धपटशहा, तोतयागिरी करणे, मतदान केंद्रापासून १०० मिटरच्या आत प्रचार करणाऱ्याला २५० रुपये पर्यंत दंड करता येते. मतदान संपण्याचा निर्धारीत वेळेपूर्वी ४८ तासाच्या अवधीत कोणतीही जाहिर सभा भरविणे, बोलाविणे किंवा हजर राहणे याला २५० रुपयापर्यंत दंड होऊ शकते. मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राजवळ गैरवर्तणुक करणाऱ्याला तीन महिन्याचा कारावास होतो. मतदानाच्या बाबतीत विविध वर्ग, धर्म, जाती, जमाती वंशभेद इत्यादीवरून शत्रुत्वाची भावना वाढविणाऱ्या तीन वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही ही होण्याची तरतूद आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ हत्यार घेऊन जाणाऱ्याला दोन वर्षाचा कारावास, दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. मतदानाच्या दिवशी उत्साहवर्धक पेय, मादक, गुंगी आणणारे पेयक, मतदान संपण्याचा ४८ तासाअगोदर पासून मतदानाच्या दिवशी हे पेय विक्री करणाऱ्याला सहा महिन्याची शिक्षा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने अनाधिकृतपणे मतदाराची ने-आण करण्याकरिता वाहन वापरल्यास, कोणत्याही उमेदवाराच्या सभेत गैरवर्तणूक करणे, मतदान केंद्र बळजबरीने ताब्यात घेणे याला कमीत-कमी एक ते तीन वर्षाचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. मतदान करण्यापासून मतदाराला रोकणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. विनापरवाना फिरत्या वाहनावर लाऊडस्पीकर लाऊन प्रचार करणाऱ्या आचारसंहितेचा भंग केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करता येते.