दोन गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 16, 2014 23:36 IST2014-06-16T23:36:20+5:302014-06-16T23:36:20+5:30

अंगणातील मांडवासाठी बल्ली गाडत असताना दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

12 people in two groups filed offense | दोन गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल

दोन गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : अंगणातील मांडवासाठी बल्ली गाडत असताना दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
आमगाव तालुक्याच्या जवरी येथील फिर्यादी सुखराम सापकू मेश्राम (७०) यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार आरोपी मुलचंद सोना मेश्राम (७०) यांच्या सोबत सुखराम मेश्राम यांचे जागेवरून वाद सुरू आहे. रविवारच्या दुपारी १२.३० वाजता दरम्यान आरोपी मुलचंद सोना मेश्राम (७०) , हरिदास मुलचंद मेश्राम (४८), मुलचंद मेश्राम याची पत्नी, हरिदासची पत्नी सर्व रा. जवरी, किडंगीपार येथील नत्थू दागोजी भांडारकर (६५), बोथली येथील यशवंतराव सुका भांडारकर या सहा जणांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीला सळाखीने व ब्लेडने मारून जखमी केले. या घटनेसंदर्भात या सहा आरोपींवर आमगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०६, ५०४, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सर्व पुरूष आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात हरिदास मुलचंद मेश्राम (४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुखराम सापकू मेश्राम (७०), पुंडलीक सुखराम मेश्राम (३४), मुकेश सुखराम मेश्राम (३२), तारकनबाई सापकु मेश्राम, पुष्पा सापकू मेश्राम व नंदाबाई मेश्राम यांनी जातीवाचक शिविगाळ करून जमीनीत गाडलेली बल्ली तू काढू नकोस असे बोलून त्यांना जातीवाचक शिविगाळ केली. आरोपींनी मुलचंद सोना मेश्राम यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. आमगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: 12 people in two groups filed offense