शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

एड्सच्या तोंडातून सुखरूप परतली ११ नवजात बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

ती जर एचआयव्ही बाधीत आहे तर प्रसूतीच्या पूर्वी त्यांना नेविरीपी सायरप देण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या नवजात बालकांची दिड महिना, ६ महिने, १२ महिने व १८ महिने त्याची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरम्यान त्या नवजात बालकांना नेविरीपी सायरपचे डोज दिले जातात. १८ महिन्यांचे झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ते बालक एचआयव्ही पॉझीटीव्ह आहे किंवा नाही हे माहिती होते.

ठळक मुद्देआता जगणार एड्समुक्त जीवन : आईच्या गर्भातच मिळाला होता आजार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : त्या ११ नवजात बालकांचे नशीब आपल्या आई पेक्षा वेगळे नव्हते. त्यांच्या आईला एचआयव्ही होता. तेव्हा ते पोटात होते. जन्माला आल्यानंतरही मृत्यूच्या डोहात जाण्याचे संकट त्यांच्यावर होते. परंतु विज्ञानाच्या काही वर्षातील अविष्कारामुळे ११ नवजातांना नवजीवन मिळाले. मागील काही वर्षापासून अशा बालकांची संख्या वाढत आहे.शासनाने काही वर्षापूर्वी एचआयव्ही-एड्सच्या धोक्याला समजून एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून जागोजागी एड्स समुपदेशन व एआरटी केंद्र उघडले. या केंद्रांच्या माध्यमातून एड्स पीडितांना उपचाराखाली आणण्यात आले. गर्भवती महिलांना एचआयव्ही तर नाही याची शहानिशा करण्यासाठी तपासणी अत्यावश्यक करण्यात आली. तपासणीत ती महिला एचआयव्ही ग्रस्त आहे किंवा नाही याची माहिती होते.ती जर एचआयव्ही बाधीत आहे तर प्रसूतीच्या पूर्वी त्यांना नेविरीपी सायरप देण्यात येते. इतकेच नव्हे तर त्या नवजात बालकांची दिड महिना, ६ महिने, १२ महिने व १८ महिने त्याची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरम्यान त्या नवजात बालकांना नेविरीपी सायरपचे डोज दिले जातात. १८ महिन्यांचे झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या चाचणीत ते बालक एचआयव्ही पॉझीटीव्ह आहे किंवा नाही हे माहिती होते. सन २०१९-२० या वर्षात ११ गर्भवती मातांना एचआयव्ही असल्याचे समोर आले. जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागील काही वर्षापासून नवजात बालकांना तपासणीत आणून त्यांचे जीवन फुलविले. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील ११ मातांची ११ बालके एचआयव्ही मुक्त झाली आहेत.तीन वर्षात ४० बालकांचे जीवन फुललेआर्थिक वर्ष २०१९-२० दरम्यान ११ माता गर्भवती असताना त्या एचआयव्ही पिडीत असल्याचे पुढे आले. ती सर्व बालके एचआयव्ही मुक्त झाली आहेत. यापूर्वी २०१७-१८ मध्ये १३, २०१८-१९ मध्ये १८ मातांना एचआयव्ही असल्याचे आढळले होते. परंतु २०१७-१८ मध्ये १२ व २०१८-१९ मध्ये १७ बालकांना या आजारातून मुक्त करण्यात आले. मागील ३ वर्षात ४२ गर्भवती महिलांना एचआयव्ही असल्याचे पुढे आले होते. त्यापैकी ४० बालके एचआयव्ही मुक्त झाले. विशेष म्हणजे, सन २०१० पासून हा कार्यक्रम चालविण्यात येत आहे. याचा लाभ अनेक बालकांना मिळत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य