शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

१०७ राईस मिल्सने केले परवान्याचे नूतनीकरण

By admin | Updated: February 3, 2016 01:51 IST

जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातिप्राप्त असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धानाचे उत्पादन व त्यामुळे धानाचा व्यापारही मंदावला आहे.

एफडीए थंड : मिल्सची संख्या घटली?गोंदिया : जिल्हा धानाचे कोठार म्हणून ख्यातिप्राप्त असला तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धानाचे उत्पादन व त्यामुळे धानाचा व्यापारही मंदावला आहे. परिणामी जिल्ह्यातील राईस मिल्स मोठ्या संख्येत बंद पडून आहेत. परिणामी ३३५ राईस मिल्समधील फक्त १०७ राईस मिलर्सकडूनच परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. धान (तांदूळ) हे खाद्य पदार्थांत येत असल्याने राईस मिल व्यवसायाला अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. धानाची मिलींग केल्यानंतर तयार झालेल्या तांदळाची विक्री केली जाते. एकंदर हा खाद्य पदार्थाचा व्यवसाय झाल्याने राईल मिल्स हा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राईस मिलर्स अन्न व प्रशासनाकडून परवाना घेतात. किमान एक वर्ष ते कमाल पाच वर्षांसाठी हा परवाना घ्यावा लागतो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून शुक्ल ठरविले आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीसाठीचा हा परवाना राहत असून यंदा जिल्ह्यातील १०७ राईस मिलर्सनेच हा परवाना घेतल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण ३३५ राईस मिल्स असून आजघडीला त्यातील मोठ्या संख्येत राईस मिल्स बंद पडून आहेत. तांदळाला मागणीच नसल्याने राईस मिल व्यवसायावर गाज आल्याची माहिती राईस मिलर्सकडून मिळते. मात्र धानाच्या कोठारातच राईस मिल्सची ही गत झाल्याने हा प्रकार मात्र आश्चर्यकारकच आहे. (शहर प्रतिनिधी)एफडीला माहितीच नाही राईस मिल्सला परवाना देण्याचे आधिकार अन्न व औषध विभागाकडे देण्यात आले आहे. असे असतानाही एफडीएकडे जिल्ह्यातील राईस मिल्सबाबत तंतोतंत माहिती नसल्याचा प्रकार जाणवला. विशेष म्हणजे एफडीएचे कार्यालय गोंदियात सुरू करण्यात आले आहे. मात्र येथे भंडारा कार्यालयातील एक लिपीक येऊन बसतात. त्यांच्याकडेही माहिती नसते तर भंडारा येथेही याबाबत माहिती नसल्याचा प्रकार दिसून आला