शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारी नराधमाला १० वर्षाचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

२८ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता गावातच एका घरी लग्न असल्यामुळे लग्न समारंभात जाण्यासाठी ती घरुन निघाली. रस्त्यात आरोपी राकेश मधुकर हाडगे (३०, रा. खोडशिवनी) याने तिला आपल्याकडे बोलावून शेजारच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रडत-रडत घराकडे येऊन तिने हकीकत आपल्या आजीला सांगितली. त्या मुलीला घेऊन आजी घटनास्थळाकडे गेली असता आरोपी जिल्हा परिषद शाळेजवळ मिळाला.

ठळक मुद्देखोडशिवनी येथील घटना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अल्पवयीन मुलीवर (१०) अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने ३० वर्षीय नराधमाला १० वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडशिवनी येथे सन २०१५ मधील ही घटना आहे.घाटबोरी-कोहळी येथील पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या आईच्या माहेरी खोडशिवनी येथे शिक्षणासाठी राहत होती. आजी-आजोबांसोबत राहून गावातील शाळेत ती शिक्षण घेत होती. २८ मार्च २०१५ रोजी दुपारी १२ वाजता गावातच एका घरी लग्न असल्यामुळे लग्न समारंभात जाण्यासाठी ती घरुन निघाली. रस्त्यात आरोपी राकेश मधुकर हाडगे (३०, रा. खोडशिवनी) याने तिला आपल्याकडे बोलावून शेजारच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रडत-रडत घराकडे येऊन तिने हकीकत आपल्या आजीला सांगितली. त्या मुलीला घेऊन आजी घटनास्थळाकडे गेली असता आरोपी जिल्हा परिषद शाळेजवळ मिळाला.पिडीत मुलीने आरोपी राकेशला ओळखून याने माझ्याशी वाईट कृत्य केल्याचे सांगीतले. यासंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ (१) (२) (आय) (ज) सहकलम ४, ६, ८, १०, बाललैगिंक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणावर मंगळवारी (दि.५) सुनावनी करताना आरोपी राकेश हाडगे याला जिल्हा सत्र न्यायाधीश-१ एस.एन.पराते यांनी १० वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात १० साक्षीदार तपासण्यात आले आहेत.तिला ही दिले होते १० रुपयांचे आमिषसडक-अर्जुनी तालुक्यातील बिर्री-सिंदीपार येथे रविवारी (दि.३) रात्री ज्या १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिला आरोपींनी १० रुपयांचे आमिष देऊन मंडईत नेले होते. त्याचप्रकारे सन २०१५ मध्ये खोडशिवनी येथे घडलेल्या या घटनेत आरोपी राकेश मधुकर हाडगे(३०) यानेही १० रुपये देण्याचे आमिष देऊन पिडीत मुलीवर अत्याचार केला होता. राकेशने तुझ्या शाळेचा ड्रेस शिवण्यासाठी मोजमाप दे म्हणून तिला जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला नेऊन एका गोठ्यात तिच्यावर अत्याचार केला होता. या दोन्ही घटनांमध्ये पिडीत मुलींचे वय १० वर्ष असून त्यांना १० रुपयांचे आमिष देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

टॅग्स :Courtन्यायालय