शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना १० वर्षांची शिक्षा

By admin | Updated: October 21, 2015 01:56 IST

जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

टेमनी येथील प्रकरण : जिल्हा न्यायालयाची सुनावणी गोंदिया : जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावंडांना जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी १० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टेमणी येथील बळीराम भुराजी किरणापुरे (५५) यांनी घटनेच्या सहा वर्षापूर्वी १२ डीसमील जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीची रजीस्ट्री करण्यासाठी ते आरोपींना वेळोवेळी म्हणत होते. परंतु आरोपी रजिस्ट्री करून न देता त्यांना धमकी देत असत. यातून अनेक वेळा त्यांची शाब्दिक चकमक उडायची. सन २०१० मध्ये दुष्काळाचे २० हजार रूपये शासनाकडून आरोपींना मिळाले. त्याच्यातून बळीरामने आपला हिस्सा मागीतला होता. त्यावेळीही त्यांच्यात वाद झाला होता. श्रावण मारूती किरणापुरे (३५) याचे लग्न झाल्यावरही चार वर्ष मूलबाळ न झाल्यामुळे श्रावण बळीरामला जादूटोणा करीत असल्याचा संशय घेत वाद करायचा. १२ जुलै २०१० च्या रात्री बळीराम आपला नातू नंदकिशोर सोबत झोपले असता रात्री १ वाजताच्या सुमारास आरोपी प्रेमलाल मारूती किरणापुरे (३२) व श्रावण मारूती किरणापुरे (३५) या दोघांनी कुऱ्हाडीने बळीरामवर घाव घालून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना घडताच नंदकिशोर ओरडत मामा रेखलाल धावत आला. त्याने या आरोपींनी घटनास्थळावरून पळताना पाहीले. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांत भादंविच्या कलम ४५८,३०७, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणावर निकाल देताना जिल्हा न्यायाधीश १ एस.आर. त्रिवेदी यांनी या प्रकरणावर सुनावणी केली.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी.बी. कुंदोजवार यांनी केला. या प्रकरणात सरकारी वकील कैलास खंडेलवाल यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी दोन्ही भावंडांना कलम ४५८ अन्वये सात वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. कलम ३०७ अन्वये १० वर्षाची शिक्षा एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएससलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)