शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

१0 दिवसीय धम्म प्रशिक्षणाची सांगता

By admin | Updated: May 30, 2014 00:12 IST

गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे १0 दिवशीय बौद्ध उपासिका धम्म प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली.

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे १0 दिवशीय बौद्ध उपासिका धम्म प्रशिक्षणाची नुकतीच सांगता झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षण हनवत मेश्राम होते. अतिथी म्हणून प्रकाश डोंगरे, देवाराम मेश्राम, राजेश मेश्राम, नरेंद्र मेश्राम, चंद्रिकापुरे व सरपंच उपस्थित होते. या धम्म प्रशिक्षण शिबिरात शिक्षिका म्हणून मुंबई येथील सुहासिनी यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात दरदिवशी ११२ ते ११५ प्रशिक्षणार्थी सहभागी होत होते. शिबिरात संस्थेचे उद्देश्य, बुद्धांची तत्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला बुद्ध धम्माचा मार्ग, महिलांना संदेश, २२ प्रतिज्ञा, रमाईचा आदर्श, पौर्णिमांचे महत्त्व, मंगलदिन तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री यावर धम्मोपदेश करण्यात आला. शिवाय भैयासाहेबांचे जीवनकार्य, बौद्धांच्या सवलती, रमाई, भीमाई यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात प्रशिक्षित झालेल्या उपासिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शिबिरामुळे आज आम्हाला खर्‍या अर्थाने धम्माची जाणीव झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी, अंधश्रद्धेत राहू नये, निर्व्यसनी राहावे, भेदभाव करू नये, अहंपणा करू नये व नियमित धम्माचे आचरण करावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीक्षा उके यांनी तर संचालन ज्ञानेश्‍वर उके यांनी केले. शिबिरासाठी अलका राहुलकर, जयश्री मेश्राम, ज्योती उके, रजनी राहुलकर, प्रियंका राहुलकर, जयश्री तिरपुडे, मंदा गजभिये, पुस्तकला मेश्राम, प्रमिला राहुलकर, साधना भावे, रूपलता मेश्राम, रमा राहुलकर, पुष्पा खोब्रागडे, सीमा चंद्रिकापुरे, विशाल उके, आम्रपाली उके आदींनी सहकार्य केले.  (प्रतिनिधी)