शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली तरी १ लाख ७८ हजार नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

१६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या देशातच कहर केला व कित्येकांना त्यांच्या कुटुंबीयांपासून हिरावून नेले. कोरोनाचा कहर पुढे होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करावे असा सल्ला दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील कोरोना लसीकरण मोहीम जोमात राबविली जात आहे. याचे फलित असे की, १६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७५१७८७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणात जिल्हा अग्रेसर असून, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १७८००० नागरिकांनी मुदत संपूनही आतापर्यंत दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी दोन्ही डोस घेणे गरजेचे असताना मात्र हे नागरिक आपल्याच मस्तीत वागत असताना दिसत आहेत.

शेतीची कामे, कोरोना गेल्याचा संभ्रम - जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असून आजघडीला जिल्ह्यात फक्त दोन बाधित आहेत. यामुळे आत कोरोना गेल्याने लस घेण्याची गरज काय, असा संभ्रम नागरिकांत आहे. शिवाय, सध्या शेतीची कामे सुरू असून डोस घेतल्यास ताप येणार व अशात कामे खोळंबणार हा विचार करूनही नागरिक दुसरा डोस टाळत असल्याचे दिसून येत आहे. 

दुसरा डोसही तितकाच आवश्यक - कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. शरीरात कोरोनाविरोधात प्रतिपिंड तयार करण्यासाठी या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांकडून सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे.- त्यानुसार, दोन्ही लसींमध्ये ठरावीक कालावधी ठरवून दुसरा डोस दिला जात आहे; कारण यातून त्या लसींची कार्यक्षमता अधिक वाढते व प्रतिपिंड तयार होऊन अधिक कालावधीपर्यंत आपल्या सुरक्षित ठेवते. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या