शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

युवकास १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2015 01:52 IST

म्हापसा : अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने राजवाडा-वेंगुर्ला येथील अटक केलेल्या श्रीपाद तांडेल या

म्हापसा : अमली पदार्थ स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने राजवाडा-वेंगुर्ला येथील अटक केलेल्या श्रीपाद तांडेल या युवकाला न्यायालयाने १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. अमली द्रव्य व मानसिक विकृतीवरील औषधे यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डेसमंड डिकॉस्टा यांनी त्याला मंगळवारी दोषी ठरवले. बुधवारी (दि. ३) त्याला शिक्षा देण्यात आली होती. १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा देताना आरोपीला १ लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न दिल्यास एका वर्षाची साधी कैदही न्यायालयाने त्याला दिली आहे. अमली पदार्थविरोधी विभागाचे उपनिरीक्षक सीताकांत नाईक यांनी आरोपी तांडेल याला मोरजी येथील बसस्थानकाजवळील खंडर जंक्शनवर छापा टाकून २१ जानेवारी २०१३ रोजी अटक केली होती. ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना ही कारवाई विभागाने केली होती. या वेळी त्याच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे १.०२६ किलो चरस ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याकडून १३० रुपये, मोबाईल फोन आणि त्याचे ओळखपत्रही ताब्यात घेतले होते. मूळ बिरामदेवी देवस्थान राजवाडा, वेंर्गुला येथील हा आरोपी घटनास्थळी चरस विकण्यास येणार, अशी माहिती विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. विभागाने नंतर त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. सरकारच्या वतीने सरकारी वकील अनुराधा तळावलीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. (खास प्रतिनिधी)