शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

ई-मेल हॅक केल्याप्रकरणी महिलेला अटक

By admin | Updated: June 16, 2015 01:10 IST

पणजी : वाहतूक अधिकाऱ्याचा अधिकृत ई-मेल हॅक करून त्या मेलद्वारे वाहतूक अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या प्रकरणात एका महिलेला सायबर

पणजी : वाहतूक अधिकाऱ्याचा अधिकृत ई-मेल हॅक करून त्या मेलद्वारे वाहतूक अधिकाऱ्यांची बदनामी करण्याच्या प्रकरणात एका महिलेला सायबर विभागाकडून अटक करण्यात आली. या महिलेचे पती वाहतूक खात्यात कामाला असतात. उत्तर गोवा साहाय्यक वाहतूक संचालकाच्या अधिकृत ई-मेलने गेले काही दिवस आक्षेपार्ह ई-मेल पाठविले जात होते. हे ई-मेल कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही पाठविले गेले होते. त्यात वाहतूक खात्यातील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्ट ठरवून त्यांच्याविषयी लाखोंचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर त्याहीपुढे जाऊन अश्लील आरोपही करण्यात आले होते. ज्या साहाय्यक वाहतूक संचालकाचा ई-मेल वापरून हे मेल पाठविण्यात येत होते ते अधिकारी उदय गावस यांच्या नजरेस ही घटना आणून दिल्यानंतर त्यांनी सायबर विभागात जाऊन तक्रार नोंदविली. तक्रार नोंदविल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली आणि हे ई-मेल कोठून पाठविण्यात आले याचा पर्दाफाशही झाला. एका २६ वर्षीय महिलेला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिच्या मोबाईलवरून हे ई-मेल गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.(प्रतिनिधी)