शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टी दिवशी कालव्यात आंघोळीला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले; घटनेने हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:34 IST

बाब्रोमोड्डी-केपे येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मौजमस्ती करण्यासाठी मडगावहून केपे येथे गेलेल्या दोन युवकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. इग्नेशियस शिरील फर्नाडिस (२२, फातोर्डा) आणि हर्षित सिंग (२०, उत्तराखंड) अशी मृतांची नावे असून, दोघेही माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होते.

रविवारी सकाळी ९ च्या सुमारास हे दोघे मडगावहून केपे तालुक्यातील साळवली-बोब्रीमोड्डी परिसरातील जलसंपदा विभागाच्या मुख्य कालव्याजवळ पोहोचले. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी कालव्यात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला.

घटनाक्रम एका नजरेत

इग्नेशियस आणि हर्षित रविवार सकाळी मडगावहून केपे येथे गेले, त्यानंतर साळवली-बोब्रीमोड्डी परिसरातील मुख्य कालव्याजवळ पोहोचले, उकाड्यामुळे दोघेही पाण्यात उतरले. मात्र काही मिनिटांतच खोल पाण्यात बुडाले. कालव्याच्या ठिकाणी पोहण्यास मनाई असूनही अनेकजण इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे; खोल पाणी आणि तीव्र प्रवाहामुळे अशा ठिकाणी अपघातांची शक्यता अधिक असून, वारंवार गस्त घालूनही धोका टळत नसल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

प्राथमिक माहितीनुसार, कालव्याच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाची तीव्रता याचा योग्य अंदाज न आल्याने दोघेही काही वेळातच पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. परिसरात कोणी मदतीला धावून येण्याआधीच ते पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस अधीक्षक संतोष देसाई देखील या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे मडगाव परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Two Drown in Canal on Holiday; Tragedy Strikes Madgaon

Web Summary : Two young men from Madgaon drowned in a canal near Kepe while swimming on a holiday. Ignacious Shiril and Harshit Singh, both hotel employees, misjudged the water's depth and strong current. Despite warnings, the area is known for accidents. Police are investigating the tragic incident.
टॅग्स :goaगोवाdrowningपाण्यात बुडणे