लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केरळमध्ये असलेल्या कोची मेट्रो प्रमाणे गोव्यातही गोवा वॉटर मेट्रो टॅक्सी प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव असून यासाठी लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोव्याचे नाव साधनसुविधांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणार आहे, असे नदी परिवाहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल गुरुवारी सांगितले.
या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार झाले. या बैठकीला कोची मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा, नदी परिवाहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले तसेच सल्लागार गितेश पवार उपस्थित होते.
वॉटर मेट्रो टॅक्सी प्रकल्पाच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक लोकनाथ बेहरा, नदी परिवाहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले व इतर उपस्थित होते. मंत्री फळदेसाई म्हणाले, गोव्यात वॉटर मेट्रो टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर सादरीकरण यावेळी करण्यात आले.
१ लाख लोक लाभ घेणार
राज्यातील जलवाहतूक अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. गोवा हे वॉटर मेट्रोसाठी उत्तम आहे. राज्यात आता सध्या जलवाहतुकीचा ४५ हजार लोक लाभ घेत आहेत. ते या प्रकल्पामुळे १ लाखांवर पोहचणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
८५ नव्या बोटी ७ मार्गावर धावणार
नदी परिवाहन मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, कोची मेट्रो टीमचे सदस्यांनी गोव्यात येऊन याविषयी पाहणी केली आहे. त्यांनी राज्यातील सात मार्ग यासाठी निवडले आहेत. एकूण ८५ नवीन बोटी यासाठी लागणार आहेत. या बोटी सात मार्गावर धावणार आहेत.
आमचा संपूर्ण प्रस्ताव पूर्ण झाल्यावर आम्ही हा केंद्र सरकारला पाठवणार आहोत. यात मोठ्या प्रामाणात रोजगारनिर्मित होणार असून ती गोमतकीयांना मिळणार आहे. तसेच यासाठी नदीचे कोणतेही नुकसान होणार नसून उलट याचा लोकांना जास्त फायदा होणार आहे.
वॉटर मेट्रो साठी निवडण्यात आलेले मार्ग
१) पणजी - बिठ्ठोणा - चोडण बेट - आंबोई - वाशी - नार्वे
२) बेती - पणजी - रायबंदर दिवाडी बेट - सांपेद्र - जुने गोवे
३) जुने गोवे - पियादे - साओ मथाईस (दिवाडी) -नार्वे - सारमानस - टोंका
४ वास्को ते कुठ्ठाळी
५) कुठ्ठाळी - मडकई - राशेम - आडपई - दुर्भाट ६) जुने गोवे - तोलतो - धावजी - गवंडाळी -कुंभारजुवे
७) पणजी - दोनापावला व्ह्यू पॉइंट - वास्को
८) पणजी - रेईश मागुश आग्वाद किल्ला बागा खाडी - शापोरा व्ह्यू पॉइंट
९) भविष्यातील टप्प्यासाठी शापोरा किल्ला - केरी -तेरेखोल हा मार्ग विचाराधीन ठेवण्यात आला आहे.
Web Summary : Goa plans a Water Metro Taxi project like Kochi, aiming for international recognition. A proposal will soon be sent to the central government after discussions with Kochi Metro officials. The project will modernize water transport, benefit one lakh people, and create jobs using 85 new boats on seven routes.
Web Summary : गोवा कोच्चि की तरह वॉटर मेट्रो टैक्सी परियोजना शुरू करेगा, जिसका लक्ष्य अंतर्राष्ट्रीय पहचान है। कोच्चि मेट्रो के अधिकारियों के साथ चर्चा के बाद जल्द ही केंद्र सरकार को प्रस्ताव भेजा जाएगा। यह परियोजना जल परिवहन को आधुनिक बनाएगी, एक लाख लोगों को लाभान्वित करेगी और सात मार्गों पर 85 नई नावों का उपयोग करके रोजगार पैदा करेगी।