शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची वाहने अखेर मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:52 IST

Goa News: ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची दोन्ही वाहने अखेर सरकारने मागे घेतली आहेत. संबंधित इव्हेंट कंपनीला ही वाहने बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पणजी - ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथांसाठी वापरलेली महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची दोन्ही वाहने अखेर सरकारने मागे घेतली आहेत. संबंधित इव्हेंट कंपनीला ही वाहने बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे.

माहिती व प्रसारण संचालक दीपक बांदेकर यांनी हा आदेश काढला. ‘स्वयंपूर्ण गोवा’ चित्ररथ महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या वाहनांवर स्वार होऊन गोवाभर फिरतोय याला प्रदेश काँग्रेसने आक्षेप घेतला होता. दोन्ही चित्ररथ रोखण्याचा इशाराही पक्षाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सध्या गोवा दौºयावर असलेले भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘इंप्रेशन’ मारण्यासाठीच महाराष्ट्र रजिस्ट्रेशनची वाहने चित्ररथांसाठी वापरल्याचा आरोप पणजीकर यांनी केला होता. गोव्यातील वाहने का वापरली नाहीत, असा त्यांचा सवाल होता.

माहिती संचालकांनी आदेशात असे म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र रजिस्ट्रेशनच्या वाहनांचा वापर ‘स्वयंपूर्ण गोवा’ संकल्पनेशी विसंगत असल्याने ही वाहने हटवावीत आणि त्याजागी गोवा रजिस्ट्रेशनच्या वाहनांचा उपयोग करावा’. गोव्यात भाजप सरकारने राजकीय स्वार्थासाठी म्हादई नदीचा कर्नाटकशी सौदा केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड महामारीत सिंधदुर्गला आॅक्सिजन पाठवून गोव्यात प्राणवायुची कमतरता केली आणि कोविड रुग्णांचे खून केले. भाजप नेहमीच गोमंतकीयांना डावलण्याचेच काम करीत आहे, असा आरोप पणजीकर यांनी केला होता.  सरकार गोमंतकीयांना डावलून बाहेरच्याना संधी उपलब्ध करुन देत आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण