कॅसिनोंसाठी आग्वाद तुरुंगाचाही वापर

By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:08:47+5:302015-06-25T01:08:55+5:30

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे आग्वाद येथे हलविण्यासाठी जागा योग्य आहे. कैद्यांच्या स्थलांतरामुळे आग्वादचा तुरुंगही आता मोकळा झालेला असल्याने तिथेही रेस्टॉरंट वगैरे

Use of firecracker prison for casinos | कॅसिनोंसाठी आग्वाद तुरुंगाचाही वापर

कॅसिनोंसाठी आग्वाद तुरुंगाचाही वापर

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे आग्वाद येथे हलविण्यासाठी जागा योग्य आहे. कैद्यांच्या स्थलांतरामुळे आग्वादचा तुरुंगही आता मोकळा झालेला असल्याने तिथेही रेस्टॉरंट वगैरे सुरू करून तुरुंगाचा वापर कॅसिनो कार्यालयांसाठी करता येईल, असे व्यक्तिगत
मत पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी बुधवारी
येथे व्यक्त केले.
‘लोकमत’शी बोलताना परुळेकर म्हणाले की, साळ किंवा जुवारी नदीत कॅसिनो ठेवता येणार नाहीत. आग्वादला योग्य ठिकाण आहे. तिथे लाटांचा त्रास होणार नाही. आग्वाद तुरुंगातील कैद्यांना कोलवाळमध्ये नेण्यात आल्याने तिथे रेस्टॉरंट व पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करता येतील. जुवारीत कॅसिनो ठेवण्यास लोकांचा विरोध होईल. साळची नदीही अगोदर उपसावी लागेल.
किनारपट्टी भागातील वाढत्या ड्रग्स व सेक्स रॅकेटविषयी विचारले असता, परुळेकर म्हणाले की, पोलिसांकडून अशा प्रकारांविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, अजूनही कारवाईचा वेग वाढायला हवा. अशा प्रकारच्या काही व्यवसायांशी पोलिसांचे संगनमत बंद झाले, तर निश्चितच ड्रग्सचे समूळ उच्चाटन होईल. पोलीस खात्यातील काही प्रामाणिक अधिकारी मात्र ड्रग्सच्या उच्चाटनासाठी खूप प्रयत्नशील आहेत. ‘लडकी चाहीए क्या,’ असे पर्यटकांना विचारणारेही किनारपट्टीत फिरतात. त्यांनाही रोखायला हवे.

Web Title: Use of firecracker prison for casinos