शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बाबूशच्या पक्ष स्थापनेस अन्य आमदारांचे असहकार्य

By admin | Updated: February 20, 2015 01:31 IST

पणजी : आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा पक्ष स्थापन करू, अशा वल्गना केल्या तरी, प्रत्यक्षात अन्य आमदारांचे त्यांना सहकार्य मिळत नाही हे गेल्या दोन दिवसांत स्पष्ट झाले आहे.

पणजी : आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नवा पक्ष स्थापन करू, अशा वल्गना केल्या तरी, प्रत्यक्षात अन्य आमदारांचे त्यांना सहकार्य मिळत नाही हे गेल्या दोन दिवसांत स्पष्ट झाले आहे. मोन्सेरात यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा ठराव काँग्रेसने केला तरी, अजून त्यांना त्याबाबतची लेखी स्वरूपात कल्पना दिलेली नाही. अजूनही त्यांना काँग्रेसने ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवलेली नाही. मात्र, मोन्सेरात यांची हकालपट्टी करावीच, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार यांनीही ठरविले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो हेही त्याच मताचे आहेत. त्यामुळे लवकरच हकालपट्टीचा आदेश निघेल. तथापि, गेल्या दोन दिवसांत मोन्सेरात यांची चाचपणी करून पाहिली तरी नवा पक्ष स्थापन करण्याबाबत त्यांना अन्य आमदारांचे सहकार्य मिळत नाही, हे स्पष्ट झाले आहे. मोन्सेरात यांचे राजकारण हे बेभरवशाचे असते. ते ऐनवेळी भूमिका बदलू शकतात. त्यामुळे अन्य आमदार त्यांच्या चालींवर विश्वास ठेवत नाहीत. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपण मोन्सेरात यांच्यासोबत जाणार नाही, असे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. माविन गुदिन्हो यांचे तर मोन्सेरात यांच्याशी पटतच नाही. अन्य अपक्ष आमदार रोहन खंवटे, नरेश सावळ हेही सध्या मोन्सेरात यांच्यापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे नवा पक्ष स्थापन करण्याची कल्पना प्रत्यक्षात येणारच नाही, असे संकेत मिळत आहेत. मोन्सेरात यांची पत्नी व ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या काँग्रेसमध्येच राहणार आहेत. एकदा काँग्रेसने हकालपट्टीचा आदेश जारी केल्यानंतर मग मोन्सेरात यांना भाजप मंत्रिमंडळात स्थान द्यावे व मगोला शह द्यावा, असाही विचार भाजपमधील एका गटाने पुढे आणल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)