शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत ‘जोर-बैठका’

By admin | Updated: June 10, 2014 01:50 IST

पणजी : गोव्याला केंद्राकडून येणे असलेले २९४ कोटी रुपये, अतिरिक्त अर्थसाहाय्य, खाणी, पर्यावरण, नगरविकास आदी विषयांसंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिल्लीत

पणजी : गोव्याला केंद्राकडून येणे असलेले २९४ कोटी रुपये, अतिरिक्त अर्थसाहाय्य, खाणी, पर्यावरण, नगरविकास आदी विषयांसंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी आदी केंद्रीय मंत्र्यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन काही विषयांबाबत चर्चा केली. हे ‘जोर-बैठकां’चे सत्र मंगळवारीही चालू राहाणार आहे. अर्थमंत्री जेटली यांनी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची सोमवारी बैठक घेतली. केंद्राकडून यापुढे मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत सर्व राज्यांची मते अजमावून पाहण्याच्या हेतूने ही बैठक बोलविण्यात आली होती. अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावीरीत्या व योग्य तेवढ्याच खर्चात अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, अशी सूचना जेटली यांनी केली. गेल्या काही वर्षांत देशाची आर्थिक स्थिती खालावली. त्यावर मात करायची आहे. काही राज्यांनी मात्र चांगली आर्थिक वाढ दाखविली आहे. देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करायला हवी व भारतीय अन्न महामंडळाचीही फेररचना करणे गरजेचे आहे, असे मुद्दे जेटली यांनी मांडले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनीही या बैठकीत भाग घेतला व केंद्रीय अर्थसंकल्पातून गोव्याला काय अपेक्षित आहे, याबाबत काही मते मांडली. नंतर स्वतंत्ररीत्याही ते जेटली यांना भेटले. गोव्याला केंद्राकडून विक्रीकराचे २९४ कोटी रुपये येणे आहे. हा विषयही मुख्यमंत्र्यांनी जेटली यांच्यासमोर मांडला. आर्थिकदृष्ट्या गोव्याची स्थिती कशी आहे व गोव्याला केंद्राकडून कोणत्या कामांसाठी कसकसे अर्थसाहाय्य अपेक्षित आहे, याविषयीही पर्रीकर यांनी जेटली यांच्याशी चर्चा केली. त्यांना निवेदनही सादर केले. केंद्रीय मंत्री नायडू यांचीही त्यांनी भेट घेतली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनाही ते आज मंगळवारपर्यंत भेटणार आहेत. (खास प्रतिनिधी)