शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातही यंदा कमी पावसाचे संकेत; दरवर्षी पडतो ११८ इंच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 08:00 IST

या अंदाजानुसार, यंदा देशात पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भारतीय हवामान विभागाने २०२६ सालातील नैऋत्य मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज आज प्रसिद्ध केला आहे.

या अंदाजानुसार, यंदा देशात पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र, गोव्याचा समावेश असलेल्या दक्षिण द्वीपकल्प आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत पाऊस समाधानकारक राहण्याचे संकेत मिळाले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये ५ टक्के कमी-अधिक फरकाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या काळातील पावसाची सरासरी ८७सेंटीमीटर इतकी असून, यंदाचे प्रमाण ९० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

सध्या प्रशांत महासागरात असलेल्या 'ला निना'ची स्थिती बदलून आता ती तटस्थ होत आहे. हवामान खाते मे २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा सुधारित आणि अधिक सविस्तर अंदाज जाहीर करणार आहे. त्यावेळी गोव्याच्या आणि इतर राज्यांच्या पावसाबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.

दरवर्षी पडतो ११८ इंच पाऊस

गोव्यात दरवर्षी होणाऱ्या पावसाचे प्रमाण हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक मानले जाते. दरवर्षी सरासरी ११८ इंच इतका पाऊस पडतो.

राज्याच्या किनारपट्टीच्या भागापेक्षा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, विशेषतः सत्तरी, सांगे आणि काणकोण यांसारख्या अंतर्गत तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. तेथे अनेकदा वार्षिक सरासरी ३५० सेंटीमीटरच्या पुढेही जाते.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागात पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक हण्याची शक्यता आहे. गोवा दक्षिण द्वीपकल्पीय क्षेत्राच्या, पश्चिम किनारपट्टीजवळ असल्याने, राज्यात पावसाचे प्रमाण देशाच्या सरासरीच्या तुलनेत चांगले राहण्याचे संकेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Likely to See Less Rain This Year: Forecast

Web Summary : India's monsoon season may bring less rain overall, but Goa and the southern peninsula should receive satisfactory rainfall. Goa typically sees 118 inches of rain annually, with higher amounts in interior regions. A more detailed forecast is expected in late May.
टॅग्स :goaगोवाRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस