शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'ते' भाषण गौतम खट्टर यानेच लिहिले, भाषणाबाबत नवा ट्विस्ट; माधव खट्टरला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:37 IST

माधव खट्टर याला वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वास्को येथील कार्यक्रमात गौतम खट्टर याने केलेल्या आक्षेपार्ह भाषणाची रचना खुद्द गौतम यानेच केली होती आणि त्यात माधव खट्टरचा थेट सहभाग नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर माधव खट्टर याला वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह भाषण प्रकरणात वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयात संशयित माधव खट्टरच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. आक्षेपार्ह भाषणाची मजकूर रचना गौतम खट्टरनेच सहभाग केली असून त्यामध्ये माधव खट्टरचा थेट नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. या निवेदनामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद

सरकारी बाजूने आणि बचाव पक्षाकडून सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. बचाव पक्षाने माधव खट्टरचा या भाषणाशी संबंध नसल्याचा मुद्दा ठामपणे मांडला, तर सरकारी बाजूने प्रकरणाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने माधव खट्टरला जामीन मंजूर केला.

गौतम रुग्णालयात दाखल

दरम्यान, पर्वरी येथे पोलिस कोठडीत असताना गौतम याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गौतमला मंगळवारी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. त्याने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करून घेण्याचा सल्ला दिला. कडक पोलिस बंदोबस्तात रात्री उशीरा त्याला रुग्णालयात आणले होते. बाह्यरुग्ण विभागात तपासणीनंतर त्याला दाखल करून घेतले. रुग्णालयातील डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयाने याबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. खट्टर याने पत्रकारांच्या प्रश्नांना 'हर हर महादेव' म्हणत उत्तर देणे टाळले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautam Khattar wrote speech; new twist, Madhav Khattar gets bail.

Web Summary : Gautam Khattar authored the controversial speech; Madhav Khattar wasn't directly involved, police revealed. Court granted Madhav Khattar bail. Gautam complained of chest pain and was admitted to hospital.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस