शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रुबीचे ढिगारे हटविण्यास सुरुवात

By admin | Updated: June 12, 2014 01:27 IST

काणकोण : गेल्या ४ जानेवारी रोजी चावडी, काणकोण येथील रुबी रेसिडन्सी या इमारत प्रकल्पातील एक इमारत कोसळून इमारतीत विविध प्रकारचे

काणकोण : गेल्या ४ जानेवारी रोजी चावडी, काणकोण येथील रुबी रेसिडन्सी या इमारत प्रकल्पातील एक इमारत कोसळून इमारतीत विविध प्रकारचे काम करणारे ३१ कामगार मृत्यू पावले होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पुण्याहून काँक्रिट क्रशिग क्रेन आणण्यात आली होती व तिच्या साहाय्याने इमारतीच्या भिंतीचे तुकडे करून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच महिन्यांपासून ते ढिगारे स्थानिक जमीनदार शंकर नाईक यांच्या शेतात पसरले होते व ते काढण्यासाठी त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. रुबी रेसिडन्सी इमारत प्रकल्पाच्या पाठीमागे असलेला व डोंगरमाथ्यावरून वाहून येणारे पाणी समुद्राला मिळणार व मामलेदार कार्यालयाजवळील नालाही या ढिगाऱ्यामुळे बुजला होता. हा नाला बुजल्याने व सकल पातळीवर मामलेदार संकुलची इमारत असल्याने पावसात या परिसरात पाणी साचल्यास मामलेदार इमारत संकुलाला धोका असल्याची बातमी ‘दै लोकमत’ने प्रसिध्द केली होती. बुधवार ११ जून रोजी येथील मातीचे ढिगारे जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून कोकण रेल्वेच्या मुळे येथील जमिनीत घालायला सुरुवात केल्याने शंकर नाईक व शेळेर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हे ढिगारे येथेच पडून राहिल्यास शेळेर येथील घरातही पाणी भरण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)