आध्यात्मिक पर्यटन ठरेल नवी ओळख!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:46 IST2026-04-20T08:44:45+5:302026-04-20T08:46:50+5:30

'गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६'चा मांडवी तीरावर रंगला उद्घाटन सोहळा.

spiritual tourism will be a new identity said cm pramod sawant | आध्यात्मिक पर्यटन ठरेल नवी ओळख!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

आध्यात्मिक पर्यटन ठरेल नवी ओळख!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देत समुद्रकिनाऱ्यांपलीकडे पारंपरिक जाऊन आध्यात्मिक पर्यटन विकसित करण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मांडवी नदीकिनारी आयोजित 'गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६'च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय परशुराम परिषद (गोवा प्रदेश) आणि पणजी नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने काल, रविवारी हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डिलायला लोबो, राष्ट्रीय परशुराम परिषदेचे गोवा प्रदेशाध्यक्ष प्रेमपाल सिंह, पणजी नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष महेश कांदोळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याची ओळख केवळ मनोरंजन आणि समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित न राहता राज्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरांनाही जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याची गरज आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पर्यटकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या कार्यकाळात भगवान परशुरामांचा पुतळा उभारण्याची संधी मिळाली, तसेच या महोत्सवाचे आयोजन करण्याचा मान मिळाल्याने आनंद होत आहे. गोव्याच्या इतिहासाशी आणि श्रद्धेशी जोडलेल्या या परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री सांवत यांनी सांगितले.

महोत्सवाची सुरुवात पारंपरिक कलश यात्रेने आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर भगवान परशुरामांची महाआरती करण्यात आली. मांडवी नदीच्या काठावर काशीहून आलेल्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या थार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला.

२० ते २४ एप्रिल दरम्यान परमपूज्य दिलीप कृष्ण भारद्वाज महाराज यांच्या हस्ते भगवान परशुराम कथावाचन होणार असून, त्यांच्या जीवनातील आदर्श आणि धर्मशिक्षण यांचे सविस्तर विवेचन करण्यात येणार आहे.

२५ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महोत्सवात देशभरातून संत, भाविक आणि सांस्कृतिक प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

याशिवाय भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित प्रकाश व ध्वनी (लाइट अँड साऊंड) सादरीकरण विशेष आकर्षण ठरत असून, त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभावी परिचय यातून करून दिला जात आहे.

आठवडाभर चालणार महोत्सव 

महोत्सवादरम्यान 'ॐ परशुरामाय नमः' या भक्तिगीताच्या सीडीचे लोकार्पण करण्यात आले. या गीतातून भगवान परशुराम यांच्या कार्याची, त्यांच्या आदर्शाची आणि गोव्याशी असलेल्या नात्याची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. 

आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक प्रवचने, सांस्कृतिक सादरीकरणे, भजन-कीर्तन, तसेच विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश असून, स्थानिकांसह पर्यटकांसाठी हा एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरत आहे. भगवान परशुराम यांच्या मूर्तीवर दररोज प्रकाश व ध्वनी (लाइट अंड साऊंड) कार्यक्रम सादर केला जाईल, अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
 

Web Title : आध्यात्मिक पर्यटन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोले, गोवा की नई पहचान।

Web Summary : मुख्यमंत्री सावंत ने कहा, गोवा समुद्र तटों से परे आध्यात्मिक पर्यटन पर ध्यान केंद्रित कर रहा है। परशुराम कार्यक्रम में, एक सप्ताह तक चलने वाला त्योहार गोवा की सांस्कृतिक और धार्मिक विरासत को उजागर करता है, पर्यटकों को आकर्षित करता है और स्थानीय अर्थव्यवस्था को बढ़ावा देता है।

Web Title : Spiritual tourism: New identity for Goa, says Chief Minister Pramod Sawant.

Web Summary : Goa focuses on spiritual tourism beyond beaches, says CM Sawant at Parshuram event. A week-long festival highlights Goa's cultural and religious heritage, attracting tourists and boosting the local economy with various religious and cultural programs.