शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

खास दर्जाचा आग्रह सोडला!

By admin | Updated: June 10, 2015 00:54 IST

गोव्याला खास दर्जा दिला जावा, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात गोवा सरकारला आता स्वारस्य उरलेले नाही. खास दर्जा मिळणे शक्य नसल्याने

सद्गुरू पाटील ल्ल पणजीगोव्याला खास दर्जा दिला जावा, या मागणीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात गोवा सरकारला आता स्वारस्य उरलेले नाही. खास दर्जा मिळणे शक्य नसल्याने त्याबाबत पाठपुरावा करत बसणे हा शक्तिपातच ठरेल, अशी राज्य सरकारची भावना बनली आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विषयातून अंगच काढून घेतले आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गोव्याला खास दर्जा केंद्राकडून मिळणे शक्य नाही, याची कल्पना पार्सेकर सरकारला पूर्णपणे आली आहे. मंत्री एलिना साल्ढाणा खास दर्जाची मागणी सातत्याने करत असल्या तरी, त्यांना मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा पाठिंबा नाही. तसेच भाजपचे अन्य आमदारही आता गंभीरपणे खास दर्जाची मागणी करत नाहीत. खास दर्जाची मागणी करणारा ठराव गोवा विधानसभेत यापूर्वी सर्वानुमते संमत केला असला तरी, त्या ठरावाचा केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा करणे राज्य सरकारने सोडून दिले आहे. केवळ जमिनींचे रक्षण व्हावे किंवा आर्थिक पॅकेज मिळावे, या हेतूने गोव्याला खास दर्जा मिळविता येणार नाही. केंद्र सरकार त्यासाठी खास दर्जा देण्यास मुळीच अनुकूल नाही. मुख्यमंत्री पार्सेकर यांना वस्तुस्थितीची कल्पना आल्यामुळे त्यांनीही खास दर्जाचा विषय सोडून दिला आहे, अशी माहिती त्यांच्या नजीकच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अलीकडेच गोवा भेटीवर येऊन गेले. गोव्याला खास दर्जा मिळायला हवा, असा मुद्दा त्यांच्यासमोर राज्य सरकारने मांडला नाही; कारण खास दर्जाचा विषय अर्थहीन आहे, अशा प्रकारचे संकेत यापूर्वी केंद्र सरकारच्या पातळीवरून गोव्याला मिळाले आहेत. गोवा हे डोंगराळ भागातील किंवा अत्यंत मागास असे राज्य नव्हे. गोव्यातील जमिनींचे रक्षण करण्यासाठी तसेच अस्मितेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारही अनेक उपाययोजना करू शकते, अशा प्रकारचा विचार भाजपच्या काही केंद्रीय नेत्यांनी गोव्यातील भाजप नेत्यांच्या मनावर बिंबवला आहे.