शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या खाणींना लवकरच ईसी

By admin | Updated: June 25, 2014 17:24 IST

पणजी : गोव्यात ५ हेक्टरहून कमी क्षेत्रफळात छोट्या खनिज खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरणविषयक दाखले देण्याचा विचार आहे, असे विधान केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री

पणजी : गोव्यात ५ हेक्टरहून कमी क्षेत्रफळात छोट्या खनिज खाणी सुरू करण्यासाठी पर्यावरणविषयक दाखले देण्याचा विचार आहे, असे विधान केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत केले. खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर, मंत्री जावडेकर, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल आदींची एक संयुक्त बैठक मंगळवारी दिल्लीत झाली. देशातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होण्यासाठी या तिन्ही खात्यांमध्ये समन्वय असायला हवा अशा प्रकारचा विचार बैठकीत व्यक्त झाला. काही राज्यांतील ठप्प असलेल्या खाण व्यवसायाचा आढावा घेण्यात आला. खाणींना व अन्य तत्सम प्रकल्पांना पर्यावरणविषयक परवाने देण्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण सांभाळून खनिज व्यवसाय सुरू करायला हवा. कमी क्षेत्रफळात लघू स्वरूपातील खनिज खाणी सुरू करू देता येतील, असाही विचार व्यक्त झाला. त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची यापुढे फेररचना केली जाणार आहे. मंडळासमोर अनेक प्रस्ताव प्रलंबित असून ते फेररचनेनंतर निकालात काढले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाच्या विविध निवाड्यांमुळे जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावरही बैठकीत ऊहापोह झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)