खाणवाल्यांकडून स्कूल बसेस बंद

By Admin | Updated: June 12, 2014 01:27 IST2014-06-12T01:17:11+5:302014-06-12T01:27:54+5:30

सावर्डे : खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चालू केलेल्या बसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद केल्याने सावर्डे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

School buses shut down by the miners | खाणवाल्यांकडून स्कूल बसेस बंद

खाणवाल्यांकडून स्कूल बसेस बंद

सावर्डे : खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चालू केलेल्या बसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बंद केल्याने सावर्डे परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या बसेस ताबडतोब पुन्हा सुरू कराव्यात न पेक्षा भविष्यात एकाही खाण कंपनीला सावर्डे पंचायत क्षेत्रात खनिज वाहतूक करू देणार नाही, असा इशारा बुधवारी सकाळी सावर्डे पंचायतीत जमलेल्या पालकांनी दिला.
२0१२ पासून खाण व्यवसाय बंद असल्याने आता चतुर्थीनंतर खाण व्यवसाय सुरू होण्याची शक्यता असूनही खाण कंपन्यांकडून विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्यासाठी बसेसची केलेली सोय अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे. या संदर्भात सावर्डे सुमारे २00 हून अधिक पालकांनी बुधवारी सरपंचांची भेट घेतली व आपली कैफियत मांडली.
या वेळी धडे-सावर्डे येथील उर्मिला नाईक यांनी सांगितले की, आमची मुले व्यवस्थितपणे या बसमधून ये-जा करीत होती. आम्हाला त्यांची काळजी वाटत नव्हती. आता प्रवासी बसेसमधून मुलांना पाठविण्यास भीती वाटत असून आता मुले घरी केव्हा पोहोचतील याची वाट पाहत राहावे लागते. खाण कंपन्यांनी ताबडतोब पूर्वीप्रमाणेच बसेस चालू करून विद्यार्थ्यांची सोय करावी, असे सांगितले. या वेळी सुहानी नाईक, दिगंबर नाईक, फिलोमिना व्हिएगस या पालकांनीही आपले मत व्यक्त केले. या वेळी उपसरपंच उल्हास नाईक, पंच दीपक सावंत हेही उपस्थित होते.
पेरीउदक सावर्डेचे अँथनी फर्नांडिस, राजेश नाईक, उमेश नाईक, नीलेश नाईक, नितेश भंडारी व इतरांनी खाण कंपन्याच्या या अरेरावी वृत्तीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त करून आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे सांगितले. (लो.प्र.)

Web Title: School buses shut down by the miners