शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या दिवसांत कपात; विरोधकांचे सरकारवर जोरदार टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:22 IST

२१ जुलै ते ८ ऑगस्टपर्यंतच चालणार विधानसभा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १८ दिवसांवरून १५ दिवस केल्यामुळे विरोधी आमदारांनी सरकारांवर जोरदार टीका केली आहे. सरकारचा कारभार सभागृहात उघडा पडेल याच भीतीने अधिवेशनाचे तीन दिवस कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे.

तीन दिवस कमी करून सरकारने त्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. मागील पावसाळी अधिवेशन हे १८ दिवसांचे घेण्यात आले होते. त्यावेळीही विरोधकांकडून दिवस कमी केल्याची टीका करण्यात आली होती. आता केवळ १५ दिवसांचेच अधिवेशन बोलविल्यामुळे विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही केली जात आहे.

भाजप सरकारने पावसाळी अधिवेशन फक्त १५ दिवसांचे करुन राज्यातील लोकांचे ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या सरकारला विरोधकांना सामोरे जायचे नाही आहे. म्हणून अधिवेशनाचा काळ कमी केला आहे. राज्यात अनेक विषय गाजत आहेत. लोकांनी आम्हाला आपले विविध विषय अधिवेशनात मांडायला दिले आहेत. पण आता अधिवेशन १५ दिवसांचे असल्याने सर्व विषय मांडता येणार नाहीत. भाजप सरकार विरोधकांना घाबरत असल्याने त्यांनी तीन दिवस कपात केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

सरकारकडून जबाबदारी झटकण्याचे काम

अधिवेशनाचे दिवस कमी केले तरी सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारचे सर्व गैरकारभार सभागृहात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई उघडे पाडतील. लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे गोवा फॉरवर्डचे महासचिव दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे.

सरकारमध्ये धाडस नाही : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, प्रत्येकवेळी सरकारकडून पावसाळी अधिवेशनाचे दिवस कमी केले जात आहेत. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी सरकारकडून हे केले जात आहे. राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती, वाढलेली बेरोजगारी या मुद्द्यावरून सभागृहात घेरले जाऊ याची कल्पना असल्यामुळेच कमीत कमी दिवसात अधिवेशन आटोपते घेण्याचा सरकारचा हा बेत आहे असे ते म्हणाले.

मनमानी कारभार : वीरेश

विरोधकाना सभागृहात बोलायला कमी दिवस मिळावेत आणि कमी वेळ मिळावा हाच दिवस कपात करण्यामागचा हेतू आहे. अजून सभागृह कामकाज समितीची बैठकही झालेली नाही. त्यामुळे अधिवेशनाचे स्वरूप कसे काय असणार? या बद्दल कुणाला काहीही ठावूक नाही. हे सरकार सर्वानाबरोबर घेऊन जाण्याची भाषा करते. परंतु प्रत्यक्षात आपल्याला हवे तेच केले जाते, असा टोला आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी लगावला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार