शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

गोव्यात 10 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्यासाठी शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 14:27 IST

गेल्या दीड वर्षाच्या काळात वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी सुमारे १0 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे. 

पणजी : गेल्या दीड वर्षाच्या काळात वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी सुमारे १0 हजार ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे केल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे.  २0१७ मध्ये ४२0७, २0१८ मध्ये आजतागायत ५७९९ वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याच्या शिफारशी वाहतूक पोलिसांकडून आल्या. १९८८ च्या मोटर वाहन कायद्याच्या कलम १९ खाली कारवाईसाठी या शिफारशी आल्या. या दीड वर्षांच्या कालावधीत तब्बल ६ लाख ८७ हजार ८८५ वाहनधारकांना वाहतूक नियमांचा भंग केल्या प्रकरणी ‘तालांव’ देऊन दंड ठोठावण्यात आला. 

याशिवाय पोलिसांनी ‘ट्राफिक सेंटिनल’ योजना सुरु केले असून वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना कॅमे-यात टिपून या उल्लंघनाचे फोटो, व्हिडिओ चित्रफिती वॉटसअपवर पोलिसांना पाठवणा-या व्यक्तीला बक्षीस देण्याबरोबरच ज्यांनी उल्लंघन केलेले आहे त्यांना दंडही ठोठावला जातो. सिग्नल तोडणे, नो एंट्रीमधून वाहन हाकणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, योग्य नंबरप्लेट नसणे, सीट बेल्ट परिधान न करणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे, काळ्या काचा असलेली मोटार, नशाबाजी करुन वाहन हाक णे, दुचाकीवर तीन-चार जणांना बसवून वाहन हाकणे आदी व अशाच प्रकारच्या अन्य वाहतूक नियमभंगाची प्रकरणांची गंभीर दखल घेतली जात आहे. गोव्यात पर्यटनासाठी स्वत:ची वाहने घेऊनही मोठ्या प्रमाणात पर्यटकही येत असतात. नशेत वाहने हाकण्याचे प्रकारही घडत असतात.  

दरम्यान, गेल्या दहा वर्षात गोव्यातील वाहनसंख्येत १३0 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. वाहतूक खात्याकडून प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार २00७-0८ साली खासगी आणि सार्वजनिक मिळून सुमारे ६ लाख २३ हजार २२९ वाहनांची नोंद होती ती गेल्या मे महिन्यात तब्बल १४ लाख ३५ हजार २७८ वर पोहोचली. गेल्या दहा वर्षांच्या काळातच वाहनसंख्या प्रचंड वाढली आहे. दरवर्षी सुमारे ८ टक्क्यांनी वाहने वाढत असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर