चातुर्मासासाठी पर्तगाळी मठात तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 06:45 IST2026-04-09T06:45:01+5:302026-04-09T06:45:20+5:30

नुकतीच एक संयुक्त बैठक श्री गोकर्ण पर्तगाळी मठात घेण्यात आली.

preparations begin at partagali math for chaturmas | चातुर्मासासाठी पर्तगाळी मठात तयारी सुरू

चातुर्मासासाठी पर्तगाळी मठात तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, पैंगीण : श्री गोकर्ण पर्तगाली मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज यंदाच्या चातुर्मास व्रताचा स्वीकार पर्तगाळी मठात करणार आहेत. दि. ५ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सेवाकार्य करण्यावर चर्चा करण्यासाठी काणकोणच्या विविध देवस्थान समित्यांची स्वामी महाराज श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने नुकतीच एक संयुक्त बैठक श्री गोकर्ण पर्तगाळी मठात घेण्यात आली.

या बैठकीला काणकोण तालुक्यातील श्री परशुराम देवालय, श्री केशव, श्री दामोदर, श्री निराकार, श्री शांतादुर्गा चामुंडेश्वर, श्री व्यंकटेश श्री मोहिनी देवालय, श्री दत्तगुरू मंदिर, श्री अश्वत्थ नारायण, श्री लक्ष्मीनारायण देवालयाच्या प्रतिनिधींबरोबरच काणकोण सारस्वत समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

चातुर्मास कालावधीत स्वागत, नोंदणी, वाहतूक, पार्किंग, निवास, सामान पूर्ती, स्वयंपाक, भोजन व अल्पोपाहार व्यवस्था, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या स्वयंसेवकांची यादी तयार करतानाच सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रासंगिक आणि उत्सवदिनी जी सेवा अभिप्रेत आहे त्यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चातुर्मास काळात सेवा कार्य करण्यास इच्छुक असलेल्या पुरुष आणि स्त्री स्वयंसेवकांनी आपली नावे अनिल पै यांच्याकडे सुपूर्द करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Web Title : चातुर्मास के लिए पर्तगाली मठ में तैयारी शुरू

Web Summary : स्वामीजी के नेतृत्व में चातुर्मास के लिए पर्तगाली मठ में तैयारियां चल रही हैं। विभिन्न मंदिर समितियों ने 5 अगस्त से 26 सितंबर, 2026 तक पंजीकरण, आवास, भोजन और स्वयंसेवकों सहित सेवाओं की व्यवस्था पर चर्चा करने के लिए मुलाकात की।

Web Title : Preparations Begin at Partagali Math for Chaturmas Observance

Web Summary : Preparations are underway at Partagali Math for the Chaturmas observance led by Swamiji. Various temple committees met to discuss arrangements for services, including registration, accommodation, food, and volunteers, from August 5th to September 26th, 2026.