शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

५५ कोटींच्या वसुलीसाठी खाण कंपन्यांना नोटिसा

By admin | Updated: February 19, 2015 02:24 IST

पणजी : राज्यातील खनिज लिजधारकांकडे यापूर्वी थकलेला वाहतूक अधिभार (सेस) वसूल करण्यासाठी वाहतूक खात्याने लिजधारक असलेल्या खाण

पणजी : राज्यातील खनिज लिजधारकांकडे यापूर्वी थकलेला वाहतूक अधिभार (सेस) वसूल करण्यासाठी वाहतूक खात्याने लिजधारक असलेल्या खाण कंपन्यांना नोटिसा पाठविण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. बुधवारी आणखी दहा खनिज लिजधारकांना खात्याने नोटिसा पाठवून त्वरित एकूण ५५ कोटी रुपयांचा वाहतूक अधिभार भरण्याची सूचना केली आहे. यापूर्वी वाहतूक खात्याने सुमारे १५० कोटी रुपयांचा अधिभार वसूल केला आहे. २००६ सालापासून हा वाहतूक अधिभार थकला होता. यापूर्वी काही खाण कंपन्यांनी वाहतूक अधिभार भरण्यास नकार दिला होता. त्यांचा अशा प्रकारच्या अधिभारास आक्षेप होता व त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. तथापि, विद्यमान सरकारने अलीकडे ८४ खाण लिजांचे नूतनीकरण करून दिल्याने व त्यापैकी ४३ लिजांबाबत करारावरही सह्या केल्याने खाण कंपन्या वाहतूक अधिभार भरण्यास तयार झाल्या. आता आणखी दहा खनिज लिजधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यात सेसा मायनिंग, सेसा रिसोर्सिस आदी काही कंपन्यांच्या लिजांचा समावेश आहे. हे ५५ कोटी रुपये आल्यानंतर २00 कोटींपेक्षा जास्त महसूल वसूल झाल्यात जमा होणार आहे. खाण खात्याने सध्या लिज करारांवर सही करणे स्थगित ठेवले आहे. ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वाहतूक खात्याला आणखी अधिभार प्राप्त होऊ शकतो. (खास प्रतिनिधी)