शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

Coronavirus: गोव्यात आणखी तीन दिवस लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 8:32 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शेजारील कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पणजी : गोव्यात सरकारने जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे आता २५ रोजी गुढी पाडव्यानंतरच सरकारचे पुढील पाऊल स्पष्ट होईल. गरज पडल्यास लॉकडाउनची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली जाईल, असे सांगण्यात आले. शेजारी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांनी ३१ पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील आढावा घेऊन जनता कर्फ्यू आणखी तीन दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर सावंत यांनी चर्चा केली. ‘कोरोना व्हायरस’च्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ  नये आणि घरीच थांबावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जनता कर्फ्यू तीन दिवसांनी वाढवला असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. आरोग्य विषयक व आणीबाणीच्या सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. सरकारी कार्यालये, खाजगी कार्यालयेही बंद राहतील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. तीन दिवसांनंतर पुन: स्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास लॉकडाउन येत्या ३१ पर्यंत वाढविला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अनेक लोकांनी यापूर्वीच अत्यावश्यक वस्तूंची बेगमी केली आहे. त्यामुळे अशा लोकांकडून फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत परंतु ज्यांनी बेगमी केलेली नाही त्यांच्यासमोर मात्र प्रश्न उपस्थित झाला. 

कर्नाटक, केरळच्या कोंबड्यांवर बंदी ‘कोरोना’बरोबरच बर्ड फ्ल्युचाही धोका असल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाºयांनी कर्नाटक व केरळमधून गोव्यात आयात केल्या जाणाºया कोंबड्यांवर बंदी घातली आहे. काल मध्यरात्रीपासून ही बंदी लागू झाली असून या राज्यांमधून थेट अथवा अप्रत्यक्षपणे गोव्यात कोंबड्यांची आयात करता येणार नाही. दक्षिण गोवा जिल्हाधिकाºयांकडूनही अशाच प्रकारचा आदेश् काढला जाणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी दुध, भाजीपाला, मासळीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या